शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
3
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
4
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
5
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
6
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
7
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
10
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
11
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
12
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
13
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
14
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
15
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
16
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
17
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
18
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
19
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
20
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान शनिवारी कोल्हापुरात 

By समीर देशपांडे | Published: February 22, 2024 2:28 PM

कोल्हापूर  : महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी (दि.२४) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार ...

कोल्हापूर  : महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी (दि.२४) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौहान येणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशमध्ये मामा या नावाने प्रसिद्ध असणारे चौहान हे मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ म्हणजे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.  सध्या ते भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर साडे नऊ वाजता बिंदू चौकात चाय पे चर्चा होईल. १० वाजता महाराणा प्रताप चौकात भिंतीवर कमळ चिन्हे रेखाटन होईल. ११ वाजता महासैनिक दरबार हॉल येथे कोल्हापूर लोकसभेबाबत तर दुपारी २ वाजता रुक्मिणी हॉल, शिरोली येथे हातकणंगले लोकसभेबाबत ते मार्गदर्शन करतील. या नियोजन बैठकीला खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, समरजित घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, संग्राम कुपेकर, अशोकराव माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा