औपचारिकता असणारी गावे, सरपंच पदासाठी आघाडीवर असणारे नाव व कंसात गट : म्हाकवे- सुनीता महादेव चौगुले (संजय घाटगे), बेनिक्रे- अश्विनी पांडुरंग गुरव (समरजित घाटगे), सोनगे- रंजना नारायण ढोले (मुश्रीफ गट), गलगले-विद्या विलास शिंदे (मंडलिक गट), गोरंबे- सुमन विष्णुपंत गायकवाड (संजय घाटगे), पिंपळगाव बुद्रुक- बंडेराव दिनकर सूर्यवंशी (मुश्रीफ गट), केनवडे- अनुराधा शशिकांत शिंदे (ना. मुश्रीफ), नानीबाई चिखली- अल्लाबक्ष हसन सय्यद (ना. मुश्रीफ), बानगे- सुनील बाबूराव बोंगार्डे (मंडलिक गट), खडकेवाडा- भाऊसाहेब पाटील (ना. मुश्रीफ), शेंडूर- अमर कांबळे (संजय घाटगे), लिंगनूर-कापशी- स्वप्नील गणपती कांबळे (ना. मुश्रीफ), बस्तवडे- सोनाबाई महादेव वांगळे (मंडलिक गट).
दरम्यान, अनेकजण आपल्या गावात सरपंच पदाचे अमुकच आरक्षण येणार म्हणून देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, आयत्यावेळी आरक्षण वेगळेच आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
...म्हणून सामान्य कार्यकर्त्यांना संधी
सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी निश्चित झाले असते, तर स्थानिक नेतेमंडळींनी आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावून ठेवली असती. परंतु ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीनंतरच आरक्षणाचा निर्णय घेतल्याने अनेक गावांत सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. याबाबत समाधान व्यक्त होत आहे.