शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोदे जंगलात शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक; बंदूक, काडतुसासह मृत रानमांजर जप्त

By संदीप आडनाईक | Updated: March 18, 2026 13:18 IST

पुढील तपास सुरू

कोल्हापूर : गगनबावडा वनपरिक्षेत्रातील कोदे खुर्द जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन घुसलेल्या एका आरोपीला वनविभागाने पकडले आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे रात्रगस्तीदरम्यान करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कोदे खुर्द येथील जंगल कक्ष क्रमांक ७९१ मध्ये रानमांजर (फटकूऱ्या) या वन्यप्राण्याची शिकार करताना आनंदा मारुती गुरव (वय ४३, रा. वेसर्डे) यास वनकर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आरोपीकडून एक बारा बोअर बंदूक, तीन जिवंत काडतुसे तसेच पोत्यात ठेवलेले मृत रानमांजर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी वनरक्षक तळीये बुद्रुक यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९(१)(फ) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, गुन्हा क्रमांक WL-०१/२०२६ दि. १८ मार्च २०२६ अन्वये पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक धैयशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल ए.डी. राऊत, वनपाल संभाजी चरापले, अमर वेटाळे तसेच वनरक्षक व रेस्क्यू टीमच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Poacher arrested in Kode forest with dead wildcat.

Web Summary : Forest officials arrested a poacher in Kode forest, Kolhapur, seizing a gun, cartridges, and a dead wildcat. The arrest occurred during a night patrol following a tip. The accused faces charges under the Wildlife Protection Act.