शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशींची; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2025 12:00 IST

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज

उद्धव गोडसेकोल्हापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर घालवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे सर्व पाकिस्तानी अधिकृतरीत्या भारतात आले होते. याचवेळी ओळख लपवून देशात राहिलेल्या परदेशींनाही हाकलून लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषत: अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात आहेत. कोल्हापुरातही असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह काही आफ्रिकन देशांचे नागरिक ओळख लपवून भारतात राहिल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देशविघातक कृत्यांमधील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात थेट काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताच सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दीर्घकाळ मुदतीचा व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. मात्र, छुप्या मार्गाने येऊन ओळख लपवून भारतात राहिलेले अनेक परदेशी नागरिक आजही देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवण्याचे आव्हान पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.

स्थानिकांची मदतसहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली होती. देहविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्या दोन्ही महिलांना सांगलीतील एका एजंटने आधारकार्ड आणि रेशनकार्ड काढून दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. यावरून परदेशी नागरिकांना मदत करण्यात आणि आश्रय देण्यात स्थानिक रहिवासी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. यांचा वेळीच शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागगेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अवैध धंद्यांमध्येही त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ओळख लपवून राहणारे परदेशी अधिक घातक ठरत आहेत.

अमली तस्करीअमली पदार्थांची तस्करी करणे आणि बनावट नोटांच्या गुन्ह्यातही काही परदेशी नागरिकांचा सहभाग आढळला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणारे दोन आफ्रिकन आरोपी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांचा वावर असल्याचे बोलले जाते.

तपास रखडले?करवीर पोलिसांकडून बांगलादेशी महिलांचा तपास सुरू होता. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड कोणी काढून दिले? त्यांना सांगलीत कोणी आणले? आश्रय कोणी दिला? त्यांना कोल्हापुरात घेऊन येणारे कोण आहेत? त्या महिलांना परत बांगलादेशात पाठवण्यासाठी पोलिसांनी काय केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान