शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली कोल्हापुरात दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:55 IST

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या काळात समाजामध्ये आनंदाचे वातावरण असते. सर्वच स्तरांवर आपापल्या परीने हा सण साजरा केला जातो. या ...

ठळक मुद्देपरदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली कोल्हापुरात दिवाळीसायबर कॉलेजचे डॉ. दीपक भोसले आणि अ‍ॅड. अश्विनी बाटे यांचा पुढाकार

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या काळात समाजामध्ये आनंदाचे वातावरण असते. सर्वच स्तरांवर आपापल्या परीने हा सण साजरा केला जातो. या काळात भारतात राहणाऱ्या परदेशी व्यक्ती या आनंदापासून वेगळ्या कशा राहतील? कोल्हापुरात शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिवाळी सण साजरा करण्याचा मोह आवरला नाही.

कोल्हापुरात शिक्षणासाठी परदेशातील अनेक विद्यार्थी वास्तव्य करून आहेत. येथील डॉ. डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, शहाजी कॉलेज तसेच भारती विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये आणि शिवाजी विद्यापीठातील विविध विभागांत तसेच सायबर महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परदेशातील, विशेष करून दक्षिण आफ्रिकेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कोल्हापुरात वास्तव्यास आहेत.सायबर कॉलेजचे डॉ. दीपक भोसले आणि अ‍ॅड. अश्विनी बाटे यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या परदेशी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या परदेशातील संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रित बोलावून त्यांच्यासोबत प्रत्येक वर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी डॉ. भोसले पुढाकार घेतात.यावर्षीदेखील केनियातील मोझेस, लुसी, ओकियो, सेमी, झांबिया येथील सेमेसो यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना दिवाळी सणाची पार्श्वभूमी, परंपरेप्रमाणे केले गेलेले फराळाचे विविध पदार्थ, भेटवस्तू देण्यात आल्या.

यासोबतच आफ्रिकेमधील संस्कृतीची तोंडओळख करण्यात आली. याप्रसंगी परदेशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले. एकंदरीतच कोल्हापूर आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी सुनट डान्स अकॅडमीचे संचालक गणेश जंगम, उद्योजक अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, रत्नप्रभा भोसले, राजश्री कारंडे, इत्यादी उपस्थित होते.

 कोल्हापुरात सायबर कॉलेजमध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. दीपक भोसले, अ‍ॅड. अश्विनी बाटे यांच्यासोबत आफ्रिकन विद्यार्थी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर