शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के साखर निर्यातीची सक्ती करा-- राजू शेट्टी : उमळवाड येथे शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे.

उदगाव : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे. उर्वरित बिले काढल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. साखरेला भाव मिळण्यासाठी देशातून ३० लाख टन साखर निर्यात केल्यास भाव आपोआप वाढतील. प्रत्येक साखर कारखान्याला १० टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्या फंडातून उमळवाडच्या विकासासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यात २५०० कोटी, तर देशात २० हजार कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकविले आहे. हे पैसे ३० जूनच्या आत अगोदर द्यावेत अन्यथा आर्थिक कोंडी होईल.उपसरपंच सरिता भवरे यांनी स्वागत, तर सागर चिपरगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावकार मादनाईक, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सचिन शिंदे, नगरसेवक नितीन बागे उपस्थित होते.मृतदेहावरील कापडालाही जीएसटीभाजप सरकारने शेतकºयांच्या वस्तूबरोबरच मृतदेहावरील कापडावरही जीएसटी लावला आहे. त्यामुळे या सरकारला आता खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही असे शेट्टी म्हणाले.भाजपमुळे दर पडलेभाजप सरकार एकीकडे सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग खरेदी करतो असे सांगतात. मग ते खरेदी केले जात नाही. भारतात अतिरिक्त साखर असताना पाकिस्तान देशातून साखर खरेदी केली जाते. भाजीपाल्याला काडीमोड भाव या भाजप सरकारमुळेच मिळत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर