शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा फुटबॉल खेळाडू सातासमुद्राकडे जाईल

By admin | Updated: November 30, 2014 23:58 IST

मालोजीराजे : ‘केएसए’च्या अमृत महोत्सवानिमित्त बालगोपाल मंडळाच्या फलकाचे उद्घाटन

कोल्हापूर : इतर जिल्ह्यांत फुटबॉल हा खेळ कमी होत असला, तरी कोल्हापुरातील जिगरबाज खेळाडू व स्थानिक फुटबॉल शौकिनांमुळे हा खेळ बहरला आहे. त्यामुळे भविष्यात येथील स्थानिक खेळाडू सातासमुद्राकडे जाईल, अशी अपेक्षा आज, रविवारी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)च्या अमृतमहोत्सवाच्या प्रारंभानिमित्त ते बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात भव्य डिजिटल फलकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, बालगोपाल तालीमचे अध्यक्ष निवास साळोखे, आदी उपस्थित होते.मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ‘केएसए’च्या आजपर्यंतच्या वाटचालीत खेळाडूंबरोबर स्थानिकांचे योगदान आहे. परदेशातील काही खेळाडू भारतात फुटबॉल संघांत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक खेळाडूही सातासमुद्रापलीकडे कोल्हापूरचा झेंडा रोवतील. इतर जिल्ह्यांत फुटबॉलचा दबदबा कमी होत आहे; पण कोल्हापुरात या खेळाने उंची गाठली आहे. आता फुटबॉलबरोबर स्विमिंग, खो-खो, बॅडमिंटन असे विविध खेळ अमृतमहोत्सवानिमित्त सुरू करण्याचाही मानस आहे.निवास साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी फुटबॉलपटू माशू मिरशिकार (इंडो बेकरी) यांनी फुटबॉल मैदानाच्या आकारातील चार बाय तीन फुटांचा केक तयार केला होता. छत्रपती शाहू महाराज व मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते तो कापण्यात आला. त्यानंतर फलकाचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू रघू पिसे, लक्ष्मण पिसे, केशव पोवार, बाळासाहेब निचिते, बाळसो बुरटे, माणिक मंडलिक, मेहबूब शिकलगार, लाला गायकवाड, निवास जाधव, चंचल देशपांडे, प्रकाश राऊत, सुरेश पाटील, बाबू घाले, नूरमहमंद देसाई, विश्वास कांबळे, बाबूराव पाटील, संभाजी जाधव यांच्यासह शहरातील उद्योगपती चंद्रकांत जाधव, विनायक साळोखे उपस्थित होते. ‘बालगोपाल’चे राजेंद्र कुरणे, सुनील पिसे, संजय साळोखे, रमेश घाटगे, नंदू सूर्यवंशी, आनंदा नरके, हिंदुराव बारड, सुशांत चव्हाण, सागर भांदिगरे, अशोक पोवार, धनाजी घाटगे, अजिंक्य भोसले, जयवंत साळोखे, अजय पोवार, ओमकार साळोखे, आदींनी केले. (प्रतिनिधी)डिजिटल फलकांमधून जुन्या स्मृतींना उजाळा...‘केएसए’चे संस्थापक छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह फुटबॉल संघ, छत्रपती फुटबॉल संघ, शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम, प्रॅक्टिस, बाराईमाम या संघांचे १९३१ च्या कारकिर्दीतील फुटबॉल संघांचे छायाचित्र लावून जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे.