शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Football : मुलांत ‘डी. सी. नरके विद्यानिकेतन’ ची बाजी, मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:12 IST

सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजया देवी यादव स्कूलचा, तर मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलने देवाळे हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

ठळक मुद्देमुलांत ‘डी. सी. नरके विद्यानिकेतन’ ची बाजी, मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलचा वरचष्मासतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजया देवी यादव स्कूलचा, तर मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलने देवाळे हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यांत डी. सी. नरके विद्यानिकेतन (कुडित्रे) संघाने विजयादेवी यादव स्कूल (पेठवडगाव) चा १-० असा निसटता पराभव केला.

हा विजयी गोल डी. सी.कडून रणवीर गायकवाड याने नोंदवला. तत्पूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यांत विजयादेवी यादव स्कूलने पन्हाळा पब्लिक स्कूलचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने एकलव्य पब्लिक स्कूल(पन्हाळा) चा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

मुलींच्या उपांत्य सामन्यात काडसिद्धेश्वर हायस्कूलने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूलचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. काडसिद्धेश्वरकडून सानिका चौगले हिने दोन, तर ऋतुजा पाटीलने एक गोलची नोंद केली. दुसºया उपांत्य सामन्यांत देवाळे हायस्कूलने किणी हायस्कूलचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. देवाळेकडून कल्याणी पाटील हिने तीन, तर सानिका खडके हिने दोन गोलची नोंद केली.मुलांचा विजयी संघ (डी. सी. नरके विद्यानिकेतन) - आदित्य पाटील, साहील खोत, संदीप आडनाईक, सनी कदम, इंद्रजित पाटील, रणवीर गायकवाड, सिद्धार्थ पाटील, वरद घाटगे, प्रभाकर पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटील, शर्विल पाटील, ओंकार मेडसिंग, सौरभ वाकरेकर, प्रथमेश पाटील, आदित्य माने, सार्थक पोवार, यश दाभोळकर, प्रशिक्षक चेतन साळोखे, शिवाजी डुबल, सागर जाधव यांचा समावेश आहे.काडसिद्धेश्वर हायस्कूल मुलींच्या विजयी संघात अर्पिता पोवार, सोनाली सुतार, सिमरन बावडेकर, शाहीन मुल्लाणी, निशा पाटील, पौर्णिमा साळे, श्रृतिका चौगले, ऋतुजा पाटील, साक्षी पाऊसकर, सानिका चौगले, स्वाती कानडे, सानिया पाटील, आरती काटकर, पुनम शिंदे, ऋतुजा लोहार, स्नेहल कांबळे, प्रशिक्षक अमित शिंत्रे, एस. जे. देवणे यांचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर