शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये चिमुकल्यांची ‘फुल्ल टू धमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:38 IST

अंगावर उडणारे पाण्याचे फवारे... बैलगाडीतून अनोखी सफारी... पपेट शो... कठपुतळीचा खेळ... अशा उत्साही वातावरणात रमणमळा येथील वॉटर पार्क येथे मुलांनी ‘फुल्ल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते लोकमत ‘बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित ‘फन फेअर इन ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क’चे.

ठळक मुद्देड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये चिमुकल्यांची ‘फुल्ल टू धमाल’लोकमत ‘बाल विकास मंच’तर्फे आयोजन

कोल्हापूर : अंगावर उडणारे पाण्याचे फवारे... बैलगाडीतून अनोखी सफारी... पपेट शो... कठपुतळीचा खेळ... अशा उत्साही वातावरणात रमणमळा येथील वॉटर पार्क येथे मुलांनी ‘फुल्ल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते लोकमत ‘बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित ‘फन फेअर इन ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क’चे.मनोरंजनातून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास साधणाऱ्या आणि बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत ‘बाल विकास मंच’च्या सन २०१९-२० च्या सदस्यांसाठी या ‘फन फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. शाळा सुरू असल्याने अभ्यासाच्या चक्रात मुले गढून गेली; पण या बालचमूंना बुधवारी घोडेस्वारी, बैलगाडी सफारी, वॉटरगेम, जादूचे प्रयोग, कठपुतळीचे खेळ अशा धम्माल कार्यक्रमांची मेजवानी देत लोकमत ‘बाल विकास मंच’ने त्यांचा दिवस संस्मरणीय केला. या बालचमूंसोबत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पालकांनीही सहभागी होत धमाल उडवून दिली.सकाळी ११ वाजता या ‘फन फेअर’ला सुरुवात झाली. प्रारंभी कठपुतळी डान्स पाहून बालचमू हरखून गेले. या कार्यक्रमामुळे काही काळ राजस्थानी संस्कृतीची अनुभूती मिळाली. त्यानंतर जादूचे विविध प्रयोग सादर करून बालचमूंना आश्चर्यचकित केले. प्रत्येक शोनंतर पडणाऱ्या टाळ्या, ‘वन्स मोअर’ची मागणी, स्टेजवर येण्यासाठी बालचमंूच्या होणाºया धावपळीमुळे कलाकारांनाही प्रयोग सादर करताना हुरूप येत होता.त्यानंतर खरी धमाल उडाली ती म्हणजे ‘कोणतेही खेळ मनसोक्त खेळा’ अशी परवानगी मिळताच मुले सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भान हरपून दंग झाली. या ठिकाणी असलेल्या विविध गेममध्ये सहभागी होत मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. पाण्यात मनसोक्त डुंबून झाल्याने कडकडून भूक लागल्यावर या ठिकाणी असलेल्या खाद्यांच्या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी, डोसा, नूडल्स अशा चटपटीत पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनीही ताव मारला. ट्रेनची सफर, घोडेस्वारी, सूरपारंब्या अशा विविध खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी मनसोक्त लुटला.मनसोक्त पाण्यातघरी जरा पाण्याची चावी सुरू केल्यानंतर ओरडणारे आई-बाबा आज मुलांसोबत स्वत: पाण्यात मनसोक्त डुंबत असल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. पालकांनी मुलांसोबत पाण्यातील विविध खेळ खेळले.अनोखी सफरीआधुनिक युगात अनेक वाहने काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. त्यांमधीलच एक वाहन म्हणजे बैलगाडी होय. अनेक मुलांनी ही बैलगाडी फक्त चित्रात किंवा टी.व्ही.मध्ये पाहिली आहे. मात्र, सदस्यांसाठी खास बैलगाडी सफारीचे नियोजन या ठिकाणी केले होते. या बैलगाडीच्या सफारीने मुलांचा आनंद द्विगुणितझाला. आपल्या मुलांच्या अनोख्या सफरीचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर