शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील तिघांना अन्नातून विषबाधा; धान्यात कीडनाशक पावडर मारल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:08 IST

जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यावस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांना नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देनागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

 

कोल्हापूर : जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यावस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांना नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. शिवगोंडा कलगोंडा पाटील (वय ६५, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर), त्यांचा मुलगा आशिष (३६), सून प्रिया (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

शिवगोंडा पाटील यांचे राजारामपुरीत किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी घरातील गोडाऊनमध्ये धान्याचा साठा ठेवला होता. त्यामध्ये किडे होऊ नये म्हणून त्यांनी औषध मारले होते. हेच धान्य ते घरी वापरत असतात. रविवारी जेवण केल्यानंतर शिवगोंडा पाटील, त्यांचा मुलगा व सूनेला उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यवस्थ झाली. शेजारील लोकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. गोडाऊनमधील धान्यावर प्रमाणापेक्षा जास्त औषध मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्री जेवणामध्ये त्या धान्याचा अंश राहिल्याने विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन तिघांचीही प्रकृती अत्यावस्थधान्यातील किडनाशक पावडरचा जेवणामध्ये अंश राहिल्याने विषबाधा झाल्याची डॉक्टरांना शक्यतानागरिकांनी दक्षता घेण्याची गरजघरात डब्यामध्ये साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये किड किंवा आळ्या होऊ नये; यासाठी लोक पावडर टाकत असतात. विशेषत: ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी हा प्रयोग केला जातो. धान्यामध्ये किती प्रमाणात पावडर टाकायची याचे प्रमाण माहीत असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातून विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल