सावरवाडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांनी तालुक्याच्या पश्चिम भागातील कोगे, बहिरेश्वर, आरे, बाचणी, शिरोली दुमाला या गावांना भेटी देऊन पाहणी केली. लॉकडाऊनकाळात ग्रामीण भागात शासनाच्या कडक नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दूध संस्थांनी सोशल डिस्टन्स पाळून संकलन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कसबा बीड मंडल अधिकारी प्रवीण माने यांनी पूर्व पूरपरिस्थितीचाही आढावा घेतला. पूररेषेत येणाऱ्या घरवस्तींना आताच सूचना देऊन त्यांचे स्थलांतर करा,अशा सूचना तलाठी व कोतवाल यांना केल्या.
लॉकडाऊन नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST