शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पन्हाळ्यात महापुराने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पोषक वातावरणामुळे जोमात आलेले पन्हाळा तालुक्यातील कुंभी आणि कासारी नदीकाठचे ऊसपीक महापुराने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पोषक वातावरणामुळे जोमात आलेले पन्हाळा तालुक्यातील कुंभी आणि कासारी नदीकाठचे ऊसपीक महापुराने कोमात गेले आहे. दिवसमान सरतील तसे ऊस नुकसानीची तीव्रता गडद होत आहे. तसेच महापुराच्या प्रवाहाने पडलेले विजेचे खांब उभारताना तांत्रिक अडचणी येत असल्याने महावितरणसाठी आव्हान बनत आहे. शेंडा कुजून कोंब फुटलेल्या उसाच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. महापुरात नुकसानभरपाईची प्रतीक्षा आणि पुराने गेलेले शेत लवकर मोकळे कसे होईल? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

कुजून फुटवे फुटलेला ऊस साखर कारखान्याने प्राधान्याने तोडला नाही, तर उसाच्या फुकण्या होऊन त्याचे जळण होणार आहे.

कारखान्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. उत्पादनासाठी घातलेला खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर येणार आहे. शिवाय नुकसानभरपाई कशी आणि कधी मिळणार, आहे याची शाश्वती नाही; परंतु रान मोकळे करून दुसऱ्या पिकासाठी झटावे लागत आहे.

म्हणून छोट्या शेतकऱ्यांनी बुडीत क्षेत्रातील उसाला कापणी लावून जनावरांचा चारा बनवत आहे. बुडीत क्षेत्रातील ऊस गुळासाठी अयोग्य असल्याने साखर कारखान्यांशिवाय बुडीत उसाला पर्याय नाही; परंतु साखर उतारा आणि इतर अडचणींमुळे साखर कारखाने चांगला आणि बुडीत उसाची टक्केवारीनुसार तोडणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे २०१९ मध्ये गेलेल्या उसाच्या तोडणीचा अनुभव या हंगामात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

महापुराच्या प्रवाहात नदीकाठच्या विजेचे खांब पडून डीपी खराब झाले आहेत. मधल्या उघडिपीत महावितरणने दुरूस्तीचे काम सुरू केले होते. पावसाचा अडथळा, वाटेची अडचण यांसह तांत्रिक अडचणींमुळे राहिलेले दुरूस्तीचे काम लांबणीवर पडणार आहे. परिणामी उरलासुरला माळरानावरील आणि नदीकाठचा ऊस पाण्याअभावी वाळल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे.

बुडक्याचे होणार खोडवे

पावसाच्या असमानतेचा आणि सततच्या पुराचा फटका नदीकाठाला बसत आहे. २०१९ च्या नुकसानीपेक्षा २०२१ च्या मातीमिश्रित गाळयुक्त पाण्याच्या महापुराने मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान झाले आहे. बुडीत क्षेत्रातील शेंडा कुजून कोंब फुटलेला ऊस जगला असला, तरी त्याच्या पोषक वाढीवर परिणाम झाल्याने उसाच्या उत्पादनात घट येणार आहे. तसेच फुटवे न सुटलेला उसाचा बुडका वाळत जाऊन त्याचे खोडवे बनत आहे.

प्रतिक्रिया

पुराचे पाणी वाढू नये आणि वाढले तर लवकर ओसरावे, यासाठी शासनाने कायमची उपाययोजना करावी. गेलेल्या उसाचे खोडवे पीक घेता येत नाही. शेत लवकर मोकळे केले तरच शेतकरी उसाचे दुसरे पीक लवकर घेऊ शकतो. साखर कारखान्याने शासनाने बुडीत क्षेत्रातील ऊस लवकर तोडण्यासाठी सक्ती करावी.

विजय आडनाईक, शेतकरी, यवलूज, ता.पन्हाळा

..............

दालमिया प्रशासनाने शेतकऱ्यांबाबत नेहमी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दालमिया कारखान्याशी संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बुडीत उसाला प्राधान्याने तोडणी दिली जाईल. दालमिया प्रशासनाकडून शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना यापूर्वी होती आणि येथून पुढेही होत राहील.

एन. सी. पालीवाल, युनिटहेड, दालमिया आसुर्ले-पोर्ले

............

दृष्टिक्षेपात नुकसान

बाधित शेतकऱ्यांची संख्या- २८००२ बाधित क्षेत्र (हेक्टर) - ६,९०९

नुकसान रक्कम - २६ कोटी ८० लाख

बाधित ऊस क्षेत्र - ६, ३२२

२२ पन्हाळा



पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठचा कुजलेला ऊस वाळून त्याचे खोडवे बनत आहे.