शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

कोल्हापूर शहरातील पूररेषा तत्काळ जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:46 IST

कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन ...

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील पूररेषा तत्काळ जाहीर करावी

कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले, तसेच पूररेषेविषयी त्यांच्याशी चर्चा केली.सन २००५ पासून २०१४ पर्यंत पूररेषासंबंधी राज्य सरकारने महानगरपालिकेला पाठविलेली पत्रे जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावीत, प्रतिबंधित क्षेत्रात भरावे टाकून बांधकाम परवाने ज्यांनी दिले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच गेल्या १0 वर्षांत ठरावीक अभियंते, अधिकारी गब्बर झाले. त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशा मागण्याही कृती समितीच्या सदस्यांनी केल्या.नदीच्या प्रवाहात बांधकाम परवाने देण्याच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. निळ्या रेषेच्या आत बांधकामे करता येत नाहीत, तरीही अशा प्रतिबंधित क्षेत्रात काही अटींवर परवाने दिले; त्यामुळे यापुढे शहरातील स्वच्छता करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही स्वच्छता करावी, अशी सूचना अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केली.नदी परिसरातील काळ्या मातीत पुराचे पाणी शिरले असल्यामुळे तेथील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याची आवश्यकता आहे, याकडेही इंदुलकर यांनी लक्ष वेधले. जानेवारी २०१८ पासून ज्यांनी परवाने दिले, अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.विकास आराखड्यात दाखविण्यात आलेल्या ओढे, नाले हटवून बांधकाम परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नाले बंद करणे, ग्रीनझोनमध्ये बांधकामे करणे याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी केली. दिलीप पवार यांनी आधी तातडीने बांधकामे थांबवा आणि नंतर दोषींवर कारवाई करा, असे सांगितले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, लालासाहेब गायकवाड, विजय साळोखे यांनीही सूचना केल्या, तर संभाजीराव जगदाळे, नितीन जाधव, भाऊ घोडके, किरण पडवळ, विनोद डुणुंंग, श्रीकांत भोसले उपस्थित होते.शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पूररेषा निश्चित होईपर्यंत नवीन तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आलेली बांधकामे थांबविण्याचे आदेश आपण नगररचना विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका