शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

‘एमपीएससी’त कोल्हापूरचा झेंडा

By admin | Updated: April 6, 2015 01:13 IST

निकाल जाहीर : कोलोलीचा विजय जाधव, खुपिरेचा भारत चौगुले प्रथम

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राजपत्रित अधिकारी ‘वर्ग एक’ आणि ‘वर्ग दोन’च्या पदांसाठी झालेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील आठ आणि सांगली जिल्ह्यातील दोन अशा एकूण दहा उमेदवारांनी यशाचा झेंडा फडकाविला आहे. त्यात कोल्हापुरातील कोलोली (ता. पन्हाळा) येथील विजय विलास जाधवने नायब तहसीलदार, तर खुपिरे (ता. करवीर) येथील भारत बबन चौगुलेने गटविकास अधिकारी (बीडीओ) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. राज्यसेवा मुख्य परीक्षा जून २०१४ मध्ये झाली. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये मुलाखती होऊन परीक्षेचा रविवारी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यातील नायब तहसीलदारपदाच्या परीक्षेत कोल्हापुरातील मोहिते कॉलनीतील सुशांत डी. कांबळे यांनी २२ व्या, संभाजीनगरमधील विक्रमादित्य दीपक घाटगेने ३८ व्या आणि म्हारूळ (ता. करवीर) येथील अशोक कृष्णा कुंभारने ५१ व्या क्रमांकाने यश मिळविले तसेच पन्हाळा येथील हरीश गुरव यशस्वी ठरला आहे. सहायक परिवहन अधिकारीपदाच्या परीक्षेत वासुंबेच्या (ता. तासगाव, जि. सांगली) विजय तानाजी पाटीलने प्रथम क्रमांकाने यश मिळविले. गटविकास अधिकारीपदाच्या परीक्षेत मांगूर (ता. चिकोडी) येथील अमोल श्रीधर जाधवने राज्यात आठवा क्रमांक मिळविला. सहायक निबंधकपदाच्या परीक्षेत कामेरी (ता. वाळवा) येथील रणजित महादेव पाटीलने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यासह हसूर दुमाला (जि. कोल्हापूर) येथील प्रशांत शिवाजीराव पाटील यशस्वी झाला आहे. पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत किसरुळ (ता. पन्हाळा) येथील प्रिया नानासाहेब पाटील २२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. परीक्षेत ए. बी. फौंडेशनच्या आठ आणि कोल्हापुरातील स्टडी सर्कलच्या दहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यशस्वी उमेदवारांवर अनेकांनी भेटून, मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.