शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत परिवारातर्फे कोल्हापुरात उत्साहात ध्वजारोहण

By भारत चव्हाण | Updated: August 15, 2022 14:30 IST

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीतर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो.

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव वर्ष ‘लोकमत’कोल्हापूर आवृत्तीच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. शिरोली औद्योगिक वसाहत येथील ‘लोकमत’ कार्यालयाच्या आवारात फाईव्ह महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर हरिचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ च्या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला. 

‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीतर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो, यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने लोकमत परिवारात उत्साहाचे वातावरण होते. कोल्हापुरातील फाईव्ह महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर हरिचंद्र शिंदे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व प्रथम महात्मा गांधी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर मेजर सुभेदार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शिंदे यांनी भारतीय लष्कारातील आल्या २९ वर्षे कार्यकाळातील काही घटना सांगितल्या. मुळचे नगर जिल्ह्यातील असलेल्या शिंदे यांनी मणीपूर, जम्मू काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा केली असून या कार्यकालात झालेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. अनेक आव्हाने स्वीकारून त्यांनी कारगीलमधील कासर येथेही युध्दकाळात सेवा बजावली आहे. 

अत्यंत शिस्तबध्द व नीटनेटक्या सोहळ्यात लोकमत परिवारात राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन घडले. सामुहिक राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिरसर दूमदूमला. याप्रसंगी लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे, जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, वृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, उपवृत्त संपादक विश्वास पाटील, सांगलीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर