शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार 

By भीमगोंड देसाई | Updated: June 28, 2025 16:15 IST

ग्रामपंचायत, महापालिका, सार्वजनिक वापरासाठी वीजदर कमी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) नवीन वीजदर लागू होणार आहे. यामध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत नव्याने लागू होणाऱ्या वीजदरात स्थिर दर मात्र वाढवला आहे. ग्रामपंचायत, महापालिका, सार्वजनिक वापर, घरगुती दारिद्र्य रेषेखालील आणि शंभर युनिटच्या आत विजेचा वापर असणाऱ्यांच्या एकूण वीज युनिटमध्ये कपात झाली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २५ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुधारित दरपत्रकानुसार हे स्पष्ट झाले आहे.विद्युत नियामक आयोगाने सन २०२४-२५ म्हणजे आताचे आणि १ जुलैपासून लागू होणारे म्हणजे २०२५-२६ या वर्षासाठी वीजदर जाहीर केले आहे. यामध्ये सध्याच्या दरपत्रकात स्थिर आकार, युनिटचे दर आणि नवीन वीजदर तर नवीन लागू होणाऱ्या पत्रकात स्थिर आकार, वीज आकार, वीज वहन दर, युनिटचा दर असे दरपत्रक जाहीर केले आहे.यानुसार दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठीच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ केली नसून, महिन्याला ३४ रुपयेच कायम ठेवले आहे. युनिटच्या दरात कपात केली असून, १.७४ ऐवजी १.४८ रुपये असा असेल. १०० युनिटच्या वर घरगुतीसाठी वीज वापरणाऱ्यांना स्थिर आकार १२८ ऐवजी १३० रुपये, व्यावसायिक कारणासाठी ५१७ ऐवजी ५२५ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या आणि नवीन वीजदरपत्रकाची तुलना केली तर स्थिर आकारात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

प्रकार - सध्याचे स्थिर आकार - सुधारित स्थिर आकारघरगुती - १२८- १३०व्यावसायिक - ५१७- ५२० ते ५२५सार्वजनिक पाणी वापर विद्युत पंप - १२९ ते १९४ - १४० ते २००उद्योग - ५८३ - ६००पथदिवे - १४२- १५०शासकीय वापर : ४२७- ४५०खासगी सार्वजनिक सेवा - ४६४- ५००

वाहन चार्जिंगसाठी वाढई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर आता पर युनिट ८ रुपये ४७ पैसे असा वीजदर आहे. येत्या मंगळवारपासून पर युनिटसाठी ९ रुपये १ पैसे द्यावे लागणार आहेत.

सध्याचे पर युनिटचे दर आणि सुधारित दरघरगुतीसाठी १०० युनिटपर्यंत पर युनिट ६.३२ रुपयांऐवजी ५.७४ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी १२.२३ रुपये ऐवजी १२.५७ रुपये, ५०० युनिटपर्यंत १८.९३ ऐवजी १९.१५ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिकसाठी २० किलोवॅटसाठी १०.४६ ऐवजी १०.३७ रुपये, ५० किलो वॅटपर्यंत १५.३८ रुपयांऐवजी १४.२२ रुपये, उद्योगासाठी २० किलो वॅटसाठी ७.८५ ऐवजी ७.८६, वीस किलो वॅटवरील वीजवापरासाठी ९.१४ ऐवजी ९.१५ रुपये, ग्रामपंचायती आणि महापालिकेसाठी ८.५७ ऐवजी ८.५१ रुपये, शासकीय सार्वजनिक वापरासाठी २० किलो वॅटसाठी ६.३ ऐवजी ४.७२, पन्नास किलो वॅटपर्यंत ८.१२ ऐवजी ७.८५ रुपये असे वीजदर लागू होणार आहे.

महावितरणने सुधारित दरपत्रकात छुपी दरवाढ केल्याचे स्पष्टपणे दिसते. दरकपात केल्याचे खोटे सांगितले जात आहे. वीजदर वाढ होणार असल्याने प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. -संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर 

राज्यातील वीज ग्राहकांसाठी १ जुलै २०२५ पासून दरकपात लागू होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सर्व घटकांसाठी वीजदर कमी केला आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक वर्षी वीजदरात घट होत जाणार आहे. -लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण