शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पाच पट, मग मदतीला उशीर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:07 IST

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर महापुराची दखल घेऊन राज्य शासन मदत कार्याला गती देत ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर महापुराची दखल घेऊन राज्य शासन मदत कार्याला गती देत नाही, अशी थेट तक्रार जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आणि त्यांनी सांगलीचा दौरा करीत चालू वर्षी कमी कालावधीत पाच पट अधिक पाऊस पडल्याची आकडेवारी देत सारवासारव केली.दरम्यान, शरद पवार यांनी तक्रार करून न थांबताना तातडीने शेतीच्या नुकसानीबद्दल पूर्ण कर्जमाफीची मागणी केली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून पूरग्रस्तांचा प्रचंड असंतोष व्यक्त होणाऱ्या बातम्या, मदत कार्यातील ढिलेपणा आणि ब्रम्हनाळच्या दुर्घटनेचे पडसाद कानी येताच पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधून आपत्तीच्या काळात राज्य शासनाने जी दक्षता घ्यायला हवी ती पुरेशीे घेत नसल्याची तक्रार केली. मोदी यांनी ही बाब फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देताच पुराच्या पाचव्या दिवशी हालचाली वाढल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगलीचा दौरा आखला. या दौºयात पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी गेल्या नऊ दिवसांत २००५ च्या महापुराच्या तुलनेत पाचपट अधिक पाऊस पडल्याचा दावा केला. आकडेवारी देखील दिली. हे सर्व सत्य असेल तर मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळास मदतकार्य सुरू करायला वेळ का लागला? ब्रह्मनाळची घटना पाच पट अधिक पडणारा पाऊस सुरू झाल्यावर सातव्या दिवशी घडली आहे. एनडीआरएफ किंवा लष्करी बोटी न गेल्याने ग्रामपंचायतीच्या बोटीने ग्रामस्थ बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली.कृष्णा खोºयाच्या पाणलोट क्षेत्रात पाच पट पडलेला पाऊस नऊ दिवसांचा सांगत असाल तर तो एका दिवसाचा निश्चित नाही. हा पाऊस पडायला सुरूवात झाली त्यावेळी कोयना वगळता बाकीची धरणे ७० ते ८० टक्के भरली होती. कोयना धरणात नऊ दिवसांत पन्नास टीएमसी पाणी आले, हा त्यांचा दावा मान्य केला आणि पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असेल तर या साºया घडामोडींची नोंद राज्य शासनाने का घेतली नाही. सलग नऊ दिवसांपैकी पहिले पाच दिवस जोरदार पाऊस झाल्यावरही जिल्हा प्रशासनाच्या पाहणी दौºयाशिवाय काही होत नव्हते. तेव्हा कोल्हापूर आणि सांगलीच्या युवकांनीच मदत कार्य हाती घेतले. ते शासनावर अवलंबून राहिलेच नाहीत. मात्र हे काम मोठ्या प्रमाणात शहरातच झाले, त्यामुळे शहरात जीवित हानी झाली नाही. याउलट ग्रामीण भागात महापुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी कोणी पोहचू शकले नाही. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. उभी पिके बुडून, कुजून गेली. लाखो रुपये किमतीची हजारो दुभती जनावरे महापुरात वाहून गेली. दूध संकलन बंद पडून कोट्यवधीचे नुकसान झाले.राज्य शासनास या पुराचे गांभीर्यच लक्षात आले नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणी नोंदही घेतली नाही. पूरनियंत्रण रेषेतील बांधकामे आणि नदी परिसरातील अडथळ्यांमुळे पाच पट अधिक पाऊस पडत असताना काय परिस्थिती उदभवून शकते, याची कल्पना सरकार करू शकत नसेल, तर ते मोठे अपयश आहे. कारण सरकार चालविणारे निवडणुकांच्या तयारीसाठी महाजनादेशाच्या यात्रेत मग्न होते. मंत्रिमंडळच मंत्रालयात नव्हते. त्यामुळे नऊ दिवस अतिवृष्टी झाल्यावर मुख्यमंत्री २००५ च्या आकडेवारीशी तुलना करीत सारवासारव करीत होते. २००५ मध्ये याच ब्रम्हनाळ आणि कोल्हापूरजवळच्या प्रयाग चिखलीला पाण्याने वेढले होते, तो पूर कमी असताना लोकांना वाचविण्यासाठी लष्कराच्या बोटी कशा धावल्या आणि आता पाच पट पाऊस नऊ दिवस पडत असताना, या लोकांना अवगत का केले गेले नाही, असाही सवाल उपस्थित होतो.जनतेने हाती घेतले मदतकार्यजिल्हा प्रशासन आपल्या कुवतीनुसार काम करीत होते पण महापुराची तीव्रता मोठी होती. शासकीय यंत्रणा कमी पडते हे लक्षात येताच, लोकांनी मदत कार्य हाती घेतले. कोणतीही मदत देण्यास लोक तयार झाले. पण हे शहरात झाले ग्रामीण भागात घर वाचवावे की जनावरे की घरातील भांडीकुंडी सांभाळावी, यात त्रेधातिरपीट झाली.प्रकृती बरी नसतानाही पूरग्रस्त भागांमध्ये दौरेमदत आणि बचावकार्यात राज्य सरकार कमी पडतेय हे लक्षात येताच शरद पवार केवळ तक्रार करून थांबले नाहीत तर प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला. दिवसातील चौदा तास मोटारीने फिरत पुरग्रस्तांची विचारपूस केली. मदतकार्य करणाºया केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्याकडे सत्ता नसेल पण अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्राधान्याने कोणते काम केले पाहिजे, प्रशासनास मदतीला कसे घेतले पाहिजे, याची उत्तम जाण आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत फडणवीस सरकारला जागे केले.