शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच पोलीस झाले फौजदार, साडेसात वर्षांनंतर संपली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:00 IST

पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच police, kolhapurnews पोलिसांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली. राज्यातील सुमारे १०६८ जणांना ही पदोन्नती देण्यात आली. पोलीस महासंचालकांनी मंगळवारी सायंकाळी हे पदोन्नतीचे आदेश काढले. तसेच पदोन्नतीपाठापाठ त्यांच्या बदलीचेही आदेश निघाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाच पोलीस झाले फौजदार, साडेसात वर्षांनंतर संपली प्रतीक्षाराज्यातील १०६५ जणांना खात्यांतर्गत पदोन्नती

कोल्हापूर : पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच पोलिसांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली. राज्यातील सुमारे १०६८ जणांना ही पदोन्नती देण्यात आली. पोलीस महासंचालकांनी मंगळवारी सायंकाळी हे पदोन्नतीचे आदेश काढले. तसेच पदोन्नतीपाठापाठ त्यांच्या बदलीचेही आदेश निघाले.कोल्हापुरात फौजदारपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये (कंसात बदलीचे ठिकाण) स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहायक फौजदार इकबाल गुलाब महात (नागपूर), पासपोर्ट विभागातील विलास भोसले (कोल्हापूर परिक्षेत्र), शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रमेश ठाणेकर (कोकण परिक्षेत्र), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील यशवंत उपराटे (कोकण परिक्षेत्र), करवीर पोलीस ठाण्यातील चंद्रकांत उर्फ राजू श्रीेपती भोसले (अमरावती) यांचा समावेश आहे.राज्यातील आठ हजार पोलीस पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली लोकमतने या विषयावर प्रकाश टाकला होता. २०१३ मध्ये खात्यांतर्गत फौजदार पदोन्नतीसाठी पोलिसांच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये १९००० जण उत्तीर्ण झाले होते. पण त्यांपैकी आतापर्यंत फक्त २४७९ जणांना फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली होती; तर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत ८५२१ पोलीस निवृत्त झाले.

उर्वरित सुमारे आठ हजार पोलिसांपैकी १०६१ जणांना फौजदार पदोन्नतीचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालकांनी काढले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित जणांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच आली. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर