शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:10 IST

संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवंशी (२२), प्रदीप सरवदे (३८) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देतलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटकआतापर्यंत सातजणांना अटक

कोल्हापूर : संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवंशी (२२), प्रदीप सरवदे (३८) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वर्चस्ववादातून संभाजीनगर स्टॅन्ड येथील विजयनगरात रविवारी रात्री अमित ऊर्फ सोन्या पाटील (रा. जुना वाशी नाका) याच्यावर तरुणांच्या गटाने हल्ला केला. यात तलवार व सशस्त्र हत्यारांचा वापर करण्यात आला होता. त्यात अमित हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल झाला. पूर्ववैमनस्यातून अमित याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुना राजवाडा पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

सोमवारी रात्री या प्रकरणातील संशयित स्वप्निल पाथरवट व राजू जरग या दोघांना अटक केली होती. पोलिसांनी मंगळवारी संशयित उदय मुळीक, अनिल जाधव, रवी जरग, धीरज सूर्यवंशी व प्रदीप सरवदे या पाचजणांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर