शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रंगणार पाच दिवस कलामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:38 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने २२ ते २६ तारखेदरम्यान कोल्हापूर कला महोत्सवाचे आयोजन ...

ठळक मुद्दे सतेज पाटील : शनिवारपासून रसिकांसाठी पर्वणीकोल्हापूर आर्ट फौंडेशनतर्फे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने २२ ते २६ तारखेदरम्यान कोल्हापूर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

दसरा चौकातील मैदानात पाच दिवस रंगणाºया या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. २२) सकाळी १० वाजता कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील चित्रकार, शिल्पकार, हस्तकारागीर सहभागी होणार आहेत. शिवाय विविध स्पर्धा, कलाप्रात्यक्षिकांचेही सादरीकरण होणार आहे. रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, पाच दिवस या रंगारंग महोत्सवाचा लाभ रसिकांना मिळणार आहे.

महोत्सवात चित्र-शिल्पकारांचे स्वतंत्र दालन असून, त्याबरोबरच कागदकाम, लाकडी खेळणी, देवदेवता-महापुरुषांच्या मूर्ती, मातीची खेळणी, पॉटरी यांचे कमर्शिअल स्टॉल असतील. शिवाय निसर्ग छायाचित्रकारांचे, तसेच कोल्हापुरातील लोकजीवन, विविध वास्तू यांचे कृष्णधवल छायाचित्रांचे प्रदर्शन असणार आहे. कोल्हापूरची खासीयत असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बचतगटांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहेत, तरी रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस समन्वयक प्रशांत जाधव, कार्यवाह अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे यांच्यासह कलाकार उपस्थित होते.शनिवार (दि. २२)सकाळी १० : उद्घाटनसायंकाळी ६ वाजता : गणेश वंदना, राजर्षी शाहू महाराज गौरवगीत व महात्मा गांधी वंदन. सादरकर्ते : शाहीर राजू राऊत.रविवार (दि. २३)सकाळी १० वाजता : बालचित्रकला स्पर्धा, बालक -पालक मेळावा. भव्य कॅनव्हासवर महात्मा गांधी जीवन दर्शन सामूहिक चित्र अविष्कारसायंकाळी सहा वाजता : सेव्हन मेलिडीज इन्स्ट्रूमेंटल (सेक्सोफोन) सादरकर्ते : प्रकाश साळोखेसोमवार (दि. २४)सकाळी १० ते १२ : चित्र-शिल्पकारांची प्रात्यक्षिके. नादब्रह्म हा शास्त्रीय सुगमसंगीत कार्यक्रम. सादरकर्ते अमोल राबाडे, नागेश पाटीलसायंकाळी ६ वाजता : रसिकरंजन वाद्यवृंद प्रस्तूत मानाचा मुजरा कार्यक्रम सादरकर्ते : महेश सोनुले.मंगळवार (दि. २५)सकाळी १० ते १२ : निमंत्रित चित्र-शिल्पकारांची प्रात्यक्षिके. डॉ. आनंद धर्माधिकारी यांचा शास्त्रीय-सुगम संगीत कार्यक्रमसायंकाळी सहा वाजता : जीवनगाणे कार्यक्रम. बासरी वादन सादरकर्ते प्रा. सचिन जगताप, केदार गुळवणी, प्रशांत देसाई.बुधवार (दि. २६)सकाळी १० ते १२ : शास्त्रीय-सुगम संगीत. सादरकर्ते : रोहित फाटक.चित्र-शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकांचा मुक्ताविष्कारसायंकाळी सात वाजता : महोत्सवाचा सांगता समारंभ, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण व ज्येष्ठ कलावंतांचा गौरव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स