शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
3
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
4
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
5
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
6
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
7
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
8
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
9
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
10
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
11
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
12
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
13
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
14
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
15
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
16
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
17
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
18
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
19
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

पाच कोटींचे रक्तचंदन जप्त

By admin | Updated: January 23, 2015 00:53 IST

पाचजणांना अटक : ट्रकसह दोन कार जप्त; निपाणीजवळ पोलिसांची कारवाई

निपाणी : केरळहून मुंबईकडे रक्तचंदन घेऊन जाणाऱ्या ट्रकसह दोन कार आणि पाच आरोपींना निपाणीत अटक करण्यात आली. या रक्तचंदनाचे वजन दहा टन असून, बाजारभावानुसार त्यांची किंमत पाच कोटी आहे. पोलिसांनी आज, गुरुवारी सायंकाळी निपाणी-मुरगूड रोडवरील लक्ष्मी पेट्रोलपंपावर ही कारवाई केली. याप्रकरणी गुरमितसिंग महेंदरसिंग (वय ५६, रा. फातियाबाद), रशिद अब्बास (४६, कारतडका, मंगलोर), महंमदशरीफ हुसेन (४७, गुरुकट्टे, बेळतंगडी), युसूफ मुसा (३६, उप्पाला), इब्राहिम मैदू (५१, रा. होटगी रोड, सोलापूर, महाराष्ट्र) या संशयित आरोपींना अटक केली आहे, तर सोहेल नावाची व्यक्ती फरार आहे. केरळ-मंगलोर मार्गे ट्रकमधून चंदनाचे लाकूड घालून वरच्या बाजूला निलगिरीचे सोट टाकून ट्रक मुंबईला जात होता. निपाणी पोलिसांना संशय आल्याने ट्रकचीझडती घेतली. त्यावेळी खालच्या बाजूला रक्तचंदनाची लाकडे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी चालक, क्लिनरला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता उर्वरित संशयितांची नावे ट्रकचालकांनी सांगितली. चंदन वाहतूक करताना दोन कारमधून संशयित आरोपी निपाणीमधील एका लॉजवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारसह पाचजणांना ताब्यात घेतले. बेळगावचे अतिरिक्त पोलीसप्रमुख बी. एस. न्यामगौडा, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील, निपाणीचे सीपीआय महेश्वर गौडा, फौजदार धिरज शिंदे, आदींनी कारवाई केली. (प्रतिनिधी