शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

भाजपचा जिल्ह्यात प्रथमच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 9, 2016 00:47 IST

चंद्रकांतदादांची प्रतिष्ठा पणाला : काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता राखण्याचे आव्हान; वर्चस्वासाठी भाजपचे ‘इनकमिंग फ्री’ सुरूच

विश्वास दिवे --कोल्हापूर --जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर महापालिका आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणूकही प्रतिष्ठेची केल्याने भाजपने जिल्ह्यात प्रथमच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात ओढले असून ‘इनकमिंग फ्री’चा कार्यक्रम सुरूच आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.जिल्ह्यात नगरपालिकांची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंगीत तालीम या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. जिल्हाभर ‘कमळ’ फुलविण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते, कार्यकर्त्यांना फोडून पक्षात आणले आहे. ज्यांचा पक्षप्रवेश शक्य झाला नाही, अशा स्थानिक आघाड्या, पक्षांबरोबर त्यांनी सर्वच पालिकांत मोट बांधली आहे. शिवसेना काही ठिकाणी त्यांच्याबरोबर आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती पक्ष महाआघाडीत सामील आहे.इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही ताकद पणाला लावली आहे. त्यांनी इचलकरंजी, गडहिंग्लज, मुरगूड, जयसिंगपूर, कुरुंदवाड, मलकापूर या पालिकांवर लक्ष केंद्रित केले. काही ठिकाणी काँग्रेसबरोबर आघाडी केली जाणार आहे.काँग्रेसकडून आ. सतेज पाटील किल्ला लढवत आहेत. कुरुंदवाड आणि पेठवडगावला काँग्रेस स्वबळावर लढत आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर येथे राष्ट्रवादीबरोबर आघाडी आहे. गडहिंग्लजला प्रयत्न सुरू आहेत, तर मलकापुरात काँग्रेस महाआघाडी सोबत आहे. शिवसेनेने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सोयीने युती केली आहे. कुरुंदवाडला शिवसेना स्वतंत्रपणे लढत असून, इचलकरंजीतही सहा उमेदवार उभे केले आहेत. गडहिंग्लज, जयसिंगपूर येथे शिवसेना महाआघाडीत आहे. मलकापुरात राष्ट्रवादीला सोबत घेत महाआघाडीला आव्हान दिले आहे. कागल आणि मुरगूडचा अजून निर्णय प्रलंबित आहे. वस्त्रनगरी म्हणून ख्याती असलेल्या जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका असलेल्या इचलकरंजीत नगरपालिकेच्या सत्तेसाठी आमदार सुरेश हाळवणकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. येथे भाजपने महाआघाडी करून ताराराणी आघाडी, जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना एकत्र केले आहे, तर काँग्रेसने राष्ट्रवादीतील मदन कारंडे व अशोक जांभळे यांना सोबत घेत आघाडी केली आहे. येथे ताराराणी आघाडीचे जहाँगीर पटेकरी यांचा उमेदवारीचा अर्ज छाननीत बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे लतिफ बैगान यांनी बिनविरोधच्या रूपाने विजयाचे खाते खोलले. त्यापाठोपाठ भाजपच्या सीमा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या धु्रवती दळवाई बिनविरोध निवडून आल्या आहेत.खासदार राजू शेट्टी यांचे होमपिच असलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील- यड्रावकर गट व सा. रे. पाटील गट एकत्रित निवडणुकीला सामोरा जात आहे, तर महाआघाडीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी आघाडी, शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील एकत्र आले आहेत. उल्हास पाटील महाआघाडीसोबत असले तरी शिवसेनेने स्वतंत्र दहा उमेदवार उभे केले आहेत.कुरुंदवाड नगरपालिकेत चौरंगी लढत होत आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. येथे एमआयएमने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला आहे. येथील राजकारण जयराम पाटील, रावसाहेब पाटील आणि डांगे घराण्याभोवतीच फिरत आहे. यावेळी डांगे कुटुंबीय भाजपसोबत, जयराम पाटील काँग्रेससोबत, तर रावसाहेब पाटील राष्ट्रवादीसोबत आहेत.पेठवडगाव नगरपालिकेत यावेळी तिरंगी लढत होत आहे. सत्तारूढ यादव गट, सालपे यांची युवक क्रांती आघाडी व भाजप-जनसुराज्यमध्ये चुरशीची लढत होत आहे. येथे भाजपने नेते-कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले आहे. यादव गटात फूट पडली आहे. यादव गटाचे विद्यमान उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी व स्वर्गीय विजयसिंह यादव यांंचे बंधू दिलीपसिंह यादव युवक क्रांती आघाडीत गेले आहेत. विद्यमान नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी येथे विकासकामांच्या जोरावर रणशिंग फुंकले आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे होमपिच असलेल्या कागलमध्येच समझोता एक्स्प्रेसच्या प्रयत्नात मुश्रीफ यांची कोंडी झाली आहे. मंडलिक गटाबरोबर आघाडी गृहीत धरून त्यांनी २0 पैकी १५ उमेदवारच दिल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी अपक्षांवर लक्ष केंद्रित केले आहे. येथे भाजपला तगडे नेतृत्व मिळाले आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक आणि भाजपची युती झाली आहे. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दोन हात करणार आहे. मुरगूड नगरपालिकेत आमदार हसन मुश्रीफ व रणजित पाटील पुन्हा एकत्र आले आहेत, तर येथे संजय मंडलिक व समरजितसिंह घाटगे यांची आघाडी झाली आहे. मंडलिक गटातून नगराध्यक्षपदासाठी पूर्वाश्रमीचे मुश्रीफ यांचे निकटवर्ती राजेखान जमादार मैदानात उतरणार आहेत.जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गडहिंग्लज नगरपालिकेत तिरंगी सामना रंगणार आहे. येथे जनता दल, महाआघाडी व राष्ट्रवादी-काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. गडहिंग्लजमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असून, भाजप व राष्ट्रवादीत इनकमिंग व आऊटगोर्इंग सुरू आहे.पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे जनसुराज्य पक्ष नगराध्यक्षपदासह सर्व १७ जागा लढवत आहे, तर भोसले गट नगराध्यक्षपदासह १२ जागा लढवत आहे. माजी नगराध्यक्ष मोकाशी गट नगराध्यक्षपदासह ५ जागा लढवत आहे. येथे समझोता एक्स्प्रेससाठी अजून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, तर ‘जनसुराज्य’च्या होमपिचवर कोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मलकापूर नगरपालिकेत कालचे शत्रू आज मित्र झाले आहेत. येथे भाजप, जनसुराज्य शक्ती व काँग्रेस एकत्र आले आहेत, तर शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव गायकवाड एकत्र येऊन त्यांचा सामना करत आहेत. जिल्ह्यात अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत (दि. ११) अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने त्यानंतरच लढतींचे चित्र अधिक सुस्पष्ट होणार आहे.कोल्हापूर जिल्हावार्तापत्र