शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:59 IST

सप्टेंबरपासून देशभर सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्र व गोवा विभागांत प्रथम, तर देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या चार महिन्यांत २१ हजार नवीन खाती सुरू झाली असून, पोस्टाच्या ४६४ कार्यालयांत ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्दे४ महिन्यांत २१ हजार नवीन खाती सुरू :प्रवर डाक अधीक्षक ४६४ कार्यालयांत ५० लाखांच्या ठेवी जमा

कोल्हापूर : सप्टेंबरपासून देशभर सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्र व गोवा विभागांत प्रथम, तर देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या चार महिन्यांत २१ हजार नवीन खाती सुरू झाली असून, पोस्टाच्या ४६४ कार्यालयांत ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.डिजिटल व कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह असलेल्या पोस्टामधूनच बँकिंग सुविधा सुरू करण्यात आली. सप्टेंबरपासून एकाच वेळी देशभर ही सुविधा सुरू झाली. पोस्टावर लोकांचा असलेला विश्वास सार्थ ठरत या बँकेने अल्पावधीत चांगले यश संपादन केले आहे. त्यातही कोल्हापुरातील पोस्ट पेमेंट बँकेने तर सातत्याने चांगली कामगिरी नोंदविली आहे.सात युनिटस्च्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६५ कार्यालयांतून ही सुविधा सुरू झाली असून, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बचत खाते, चालू खाते, पैसे भरणे व काढणे, डीबीटी, बिल यांच्यासह व्यापारी पेमेंटचीही सुविधा या बँकेमार्फत दिली जात आहे.ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, लघुउद्योजक, किरकोळ व्यापारी, किराणा व्यापारी यांना डोळ्यांसमोर ठेवून सुविधा पुरविल्या जात आहेत. या ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात खाती उघडावीत म्हणून पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांना मोबाईल अ‍ॅप, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या बैठकीला व्यवस्थापक अमोल कांबळे उपस्थित होते.फक्त आधार कार्डवर खाते उघडाझिरो बॅलन्सवर हे खाते उघडता येत असल्याने सर्वसामान्यांना या बँकेचा चांगला आधार मिळाला आहे. केवळ आधार कार्ड नंबर व अंगठा एवढ्याच पुराव्यावर खाते उघडता येत असल्याने अन्य कागदपत्रांच्या कटकटीपासून सुटका झाली आहे. कमी वेळेत खाते उघडणे शक्य झाले आहे.

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसkolhapurकोल्हापूर