शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर लालपरी धावली, कोल्हापुरातून या मार्गावरुन एसटीचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 13:03 IST

कोल्हापुरातूनही आज सकाळी पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे.

कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून ठप्प असलेल्या एसटीची चाके आता पुन्हा गतीमान होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर अखेर तोडगा काढल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर राज्यात हळूहळू सर्वत्र एसटी वाहतूक सुरु करण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हापुरातूनही आज सकाळी ९.३० च्या सुमारास पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे.तत्पूर्वी काल, गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची शपथ घेतली. मात्र, मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन आज, शुक्रवारपासून कामावर हजर राहावे, अन्यथा बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. त्यामुळे सायंकाळी कर्मचाऱ्यांमध्ये आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हायचे की नाही याबाबत चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत कर्मचारी आंदोलनावर ठाम होते. मात्र अखेर आज एसटी चाके पुन्हा धावू लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संपichalkaranji-acइचलकरंजी