शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पहिला श्रावण सोमवार : बंद दाराबाहेरून शिवशंभोचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:29 IST

श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देपहिला श्रावण सोमवार : बंद दाराबाहेरून शिवशंभोचे दर्शन भक्ताविना मंदिरेदेखील सुनेसुने

कोल्हापूर : श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणूनच घराघरांत ओम नमः शिवायचा जप करत भाविकांनी भगवान शंकराची आराधना केली. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले.श्रावण महिन्यात शिव शंकराची आराधना केली जाते. कोल्हापूर हे शिवाचे स्थान मानले जाते. आदिमाया अंबाबाईच्या डोक्यावर शिव लिंग स्थापित आहे. याशिवाय जिल्ह्याच्या चोहीकडे ठिकठिकाणी शिव मंदिरे आहेत.

पंचगंगा नदी घाट तसेच शहरातदेखील अनेक प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत. या ठिकाणी दरवर्षी श्रावणात भाविकांची मोठी गर्दी असते. धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा मात्र कोरोनाने सगळ्यांना भीतीच्या छायेत बंदिस्त केले आहे. मंदिरे बंद आहेत, लोकांना देवदर्शनासाठी देखील जाता येत नाही. बाहेर संसर्गाची भीती. देव भक्तांच्या प्रतीक्षेत, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.देवाची आराधना करण्यासाठी मंदिरात जाता आले नाही, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घरातील शिवलिंगाचे पूजन केले. अभिषेक, वस्त्र माळ, धूप आरती करून शिवशंकराचा जाप करण्यात आला. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले.

कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. दिवसभर व्रतस्थ राहून रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात आला. शहरातील उत्तरेश्वर, वटेश्वर, कपिलेश्वर, कैलासगडची स्वारी मंदिर अशा विविध शिव मंदिरांत सकाळी विधिवत पूजा करून मंदिर बंद करण्यात आले.मंदिर सुनेसुनेसांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात प्रत्येक सण, धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मंदिरांमध्ये भाविकांचा राबता असतो. यंदा प्रथमच भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद आहेत, तर भक्ताविना मंदिरेदेखील सुनेसुने वाटत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShravan Specialश्रावण स्पेशलkolhapurकोल्हापूर