कोल्हापूर : कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील सर्किट हाऊसच्या पाठीमागील कल्पना पाटील यांच्या बंगल्यातील बागेत वृक्षप्रेमी परितोष उरकुडे आणि वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांना ‘सीग्रेप’ (सागरी द्राक्षे) हा आगळावेगळा विदेशी वृक्ष आढळला. जिल्ह्यात या वृक्षाची प्रथमच शास्त्रीय नोंद झाली आहे.दहा-बारा वर्षांपूर्वी ‘फायकस लायरेटा’ या नावाने मलकापूर येथील नर्सरीतून आणलेल्या या वृक्षाची कल्पना पाटील यांनी लागवड केली होती. बाचूळकर यांनी या वृक्षाचे शास्त्रीय निरीक्षण केले असता त्याला फुले आणि फळे आल्याचे दिसून आले. यावरून हा वृक्ष फायकस लायरेटा नसल्याचे स्पष्ट झाले. पाटील यांच्या बागेत सीग्रेपचे तीन वृक्ष आहेत, यापैकी दोन नर, तर एक मादी वृक्ष आहे. आपल्या भागात या वृक्षांना फुलांचा बहर कमी येतो तसेच फलधारणा कमी प्रमाणात होते.
शास्त्रीय नाव : कोकोलोबा युव्हीफेराकूळ : पॉली गोनेएसीआढळ : समुद्रकिनारी प्रदेशद्राक्षांच्या घडाप्रमाणे फळांचे गुच्छ८ ते १५ मीटर उंच वाढतोफांद्या : अनेक, सर्व बाजूने पसरलेल्यापाने : साधी एकाआड एक, गोलाकार, ८ ते १५ सेंमी लांब आणि २० ते २५ सेंमी रुंदफुले : पांढरी, लहान आकाराची व सुगंधीफुले फांद्यांच्या टोकांवर ६ ते १० सेंमी लांब मंजिरीत येतातफळांचे झुपके द्राक्षांप्रमाणे खाली लोंबतात.फळे गोलाकार, दोन सेमी व्यासांची, हिरवी, तांबूस व पिकल्यानंतर जांभळट रंगाची, रसाळफळांत एकच टणक, गोलाकार बीफळांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅलशियम, झिंक, लोहफळांपासून जॅम, जेली बनवितात