शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:37 IST

Divyang Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामकाज शहरात आणखी पाच दिवस चालणार आहे.

ठळक मुद्देदिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात ५२ दिव्यांगांची नोंदणी : पाच दिवस चालणार अभियान

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामकाज शहरात आणखी पाच दिवस चालणार आहे.या अभियानाअंतर्गत महानगपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्यविषयक संदर्भसेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. उद्देश साध्य करण्यासाठी अभियानाची अमंलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार आहे.पहिल्या टप्यामध्ये सोमवारी प्रशासक तथा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सदरबाजार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन सर्वेक्षणाचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल पाटील, समन्वयक राजेंद्र आपुगडे, क्रांती संघटनेचे संजय आडके, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अतुल धनवडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे देवदत्त माने, पॅराऑलिम्पिक स्पोर्टस असोसिएशनचे अरुण विभुते व विनायक सुतार उपस्थित होते.दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षण करायला येणाऱ्या आशा वर्कर्सकडे आपली अचूक माहिती द्यावी. सोबत फोटो, आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र व बँक पासबुकची झेरॉक्स प्रतसुद्धा द्यावी, असे असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. 

टॅग्स :Divyangदिव्यांगCorona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका