शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कागलच्या शाहू कारखान्याची विनाकपात 3032 रुपयांची पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 16:18 IST

राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे.

ठळक मुद्देशाहू कारखान्याच्या परंपरेनुसार हंगामासाठी चांगला दर देणार कारखान्याचा सन २0१७-१८ या चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरुशाहू कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३0३२ रुपये इतकी निश्चित

कागल, दि. १0 : राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे.कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे. परंपरेप्रमाणे शाहू कारखान्याकडून देण्यात येणारा अंतिम दर सर्वात जास्त असेल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.कागल येथील श्रीमंत छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या २0१७-१८ या गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी प्रतिटन ३0३२ रुपये इतकी देत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शासनाच्या निर्णयानुसार या हंगामासाठी शाहू कारखान्याची एफआरपी प्रतिटन २८३२ इतकी होते. परंतु मागील आठवड्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निघालेल्या तोडग्यानुसार एफआरपीमध्ये प्रतिटन २00 रुपयांची वाढ सर्वांनी मान्य करुन पहिल्या उचलीबाबतचा प्रश्न सोडविला होता.

याशिवाय एफआरपीबरोबर प्रतिटन १00 रुपये आणि नंतर प्रतिटन १00 रुपये अशी प्रतिटन २00 रुपयांची वाढ देण्याचे निश्चित करुन त्यास सर्वांनी मान्यता दिली होती.

शाहू कारखान्याने मात्र हे दोनशे रुपयांची वाढ एफआरपीबरोबरच देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाहू कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३0३२ रुपये इतकी निश्चित करुन त्याप्रमाणे उस बिले अदा करण्यात येणार आहे.

ही पहिली उचल असून शाहू कारखान्याच्या परंपरेनुसार या हंगामासाठीही निश्चितच चांगला दर देण्यात येणार आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

कारखान्याचा सन २0१७-१८ या चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरु झाला असून या हंगामाकरिता कारखान्याने ८ लाख २५ हजार टन गळीताचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. व्यवस्थापनाने या हंगमाासाठी प्रतिदिनी ७५00 टन गळीताचे विस्तारीकरण पूर्ण केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर