शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सभापती वसंत लेवेंवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा साताºयातील हा पहिलाच गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:23 IST

सातारा : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगरसेवक व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

ठळक मुद्देपोलिसांनी मोनेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.व्हिडीओ चित्रीकरणामध्ये आणखी काही नगरसेवकांचा समावेश

सातारा : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगरसेवक व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या व्हिडीओ चित्रीकरणामध्ये आणखी काही नगरसेवकांचा समावेश असून, संबंधित नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक व नगरसेवक अशोक मोने यांनी फिर्याद दिली आहे. सातारा पालिकेमध्ये गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये बोलू दिले जात नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी अशोक मोने यांचा गळा धरून त्यांना ढकलून दिले होते. या प्रकारानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सायंकाळी वसंत लेवे यांनी अशोक मोने यांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी मोनेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

दरम्यान, अशोक मोने यांनी आपल्याला वसंत लेवे यांनी शिवीगाळ करत राष्ट्रगीत सुरू असताना ढकलून दिले. त्यानंतर धमकी देत ते सभागृहाबाहेर निघून गेले, अशी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वसंत लेवे यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.पालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीत सुरू असताना घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये बरेच नगरसेवक राष्ट्रगीत सुरू असताना सभागृहात हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.साताºयातील हा पहिलाच गुन्हाराष्ट्रगीताचा अवमान केल्याचा सभापती वसंत लेवेंवर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रगीताच्या अवमानप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची साताºयातील ही बहुधा पहिलीच घटना आहे. राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ (३) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा सिद्ध झाल्यास कमीत कमी एक वर्षे आणि जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा कायद्यात नमूद आहे.

 

टॅग्स :IndiaभारतPoliticsराजकारण