शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 12:31 IST

काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी सहकारी औद्योगिक वसाहतीमधील काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आज, गुरुवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, मूळचे जयसिंगपूर येथील उद्योजक सुशील नथुराम गुप्ता यांनी चार वर्षांपूर्वी हसूरचंपू येथील औद्योगिक वसाहतीत काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्याच्या सुमारे ५ हजार चौरस फूटाच्या शेडमधील गोदामात काजूची टरफले मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते.दरम्यान, गुरूवारी (१३) पहाटे  ४ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने कारखान्यात आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण गोदामाला घेरले. त्यामुळे आग विझवण्यासाठी गडहिंग्लज व कागल येथून अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या मागविण्यात आल्या. दोन जेसीबीच्या सहाय्याने काजुची टरफलाची पोती बाजूला काढून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्नीशमन दलाच्या  जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.आगीत कारखान्याचे शेड, मशिनरी व काजु टरफलाचा कच्चा माल मिळून सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रमुख महादेव बारामती, हसूरचंपूचे उपसरपंच सचिन शेंडगे, जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफिक नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.म्हणूनच अनर्थ टळला..!जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफिक  नाईकवाडे यांनी आगीची तमा न बाळगता जेसीबी मशीन थेट आगीत घुसवुन टरफलाच्या पेटलेल्या पोती कारखान्याच्या बाहेर मोकळ्या जागेत काढून टाकत होते. त्यावर पाणी मारून आग विझवण्यात येत होती. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. अन्यथा शेजारी आणखी एक काजू कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग