शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 10:53 IST

fire audit Muncipalty Hospital Kolhpaur- कोल्हापूर शहरातील सरकारीसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी अग्निशमन विभागाला तशा सूचना केल्या आहेत. अग्निशमनच्या सुविधा नसणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेची कार्यवाही अग्निशमनच्या सुविधा नसल्यास होणार कारवाई

कोल्हापूर : शहरातील सरकारीसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी अग्निशमन विभागाला तशा सूचना केल्या आहेत. अग्निशमनच्या सुविधा नसणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.भंडारा येथील सरकारी रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांचेही फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सोमवारी अग्निशमन विभागाला शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत.३०३ रुग्णालयांची होणार तपासणीराज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या रुग्णालयासह शहरातील खासगी ३०३ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. आपत्कालिन स्थितीसाठी त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. आगप्रतिबंधक साधनसामग्रींची मोडतोड झाली असल्यास अथवा कमतरता असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

वास्तविक महापालिकेकडून दरवर्षी अग्निशमन सुविधांसंदर्भातील बी फॉर्म घेतल्याशिवाय परवाना नूतनीकरण केला जात नाही. यामुळे बहुतांशी रुग्णालयांसह इतर व्यावसायिकांचेही फायर ऑडिट केले आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट नव्याने केले जाणार असून काही त्रुटी असल्यास संबंधितांना नोटीस बजावून कारवाई केली जाईल.- रणजित चिले, अग्निशमन दल प्रमुख

टॅग्स :fireआगMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल