शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

CoronaVirus Kolhapur : बेशिस्त नागरिकांवर साडेतीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:28 IST

CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यात कोरोना महामारीचा कहर होत असताना संचारबंदीत नागरिकांचा बेशिस्तपणा सुरुच आहे. याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारक अशा एकूण २४९९ जणांवर कारवाई करत सुमारे ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देबेशिस्त नागरिकांवर साडेतीन लाखांचा दंड कोरोना संचारबंदीचे उल्लंघन : २४९९ जणांवर कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना महामारीचा कहर होत असताना संचारबंदीत नागरिकांचा बेशिस्तपणा सुरुच आहे. याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारक अशा एकूण २४९९ जणांवर कारवाई करत सुमारे ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच तो आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी पुकारली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल २३२१ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

यापैकी १४७ दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २१७४ वाहनधारकांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून २ लाख ७७ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्क फिरणाऱ्या ३२५ जणांकडूनही ८० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. अशा या बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर