शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नियम उल्लंघनप्रकरणी तब्बल पावणे अकरा लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 1:02 PM

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यात पोलीसही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून संसर्गाचा फैलाव कमी करण्यासाठी झटत आहेत.

ठळक मुद्देनियम उल्लंघनप्रकरणी तब्बल पावणे अकरा लाखांचा दंड वसूल सर्वाधिक वाहन केसेसमधून ५ लाखांचा दंड : प्रथमच चारचाकी वाहनांवरही कारवाई

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यात पोलीसही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून संसर्गाचा फैलाव कमी करण्यासाठी झटत आहेत. तरीसुद्धा वीकेंड लॉकडाऊन असूनही दिवसभरात मास्क न वापरणे, वाहन नियमांचा भंग करणे, निर्धारीत वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणे अशा विविध केसेसद्वारे पोलिसांनी दिवसभरात १० लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तर ६३५ दुचाकी वाहने जप्त केली.ह्यब्रेक द चेनह्ण अतंर्गत कोल्हापूर पोलीस दलाने नियमभंग करून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आक्रमक कारवाईस गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात अशा विनाकारण व मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात मास्क न घातल्याप्रकरणी २ हजार ६१६ जणांकडून ४ लाख ५० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.

मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी २ हजार ४५२ जणाकडून सर्वाधिक ५ लाख ४ हजार ३०० रुपयांचा व निर्धारित वेळेनंतरही आस्थापना उघडी ठेवल्याबद्दल १८२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यातून १ लाख ३४ हजार रुपये असा एकूण १० लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.चारचाकींविरोधात जोरदार मोहीमदुचाकीवरून विनाकारण फिरल्यानंतर पोलीस कारवाईस सामोरे जावे लागते म्हणून अनेक जण चारचाकीतून फिरत आहेत. याशिवाय शनिवार व रविवार असे वीकेंड धरून पन्हाळा, आंबा आदी ठिकाणी पर्यटनही करीत आहेत. ही बाब जाणून रविवारी सायंकाळी दसरा चौक येथे लक्ष्मीपुरी पोलीस व शहर वाहतूक शाखेच्यावतीने १०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या चारचाकी जप्त करण्यात आल्या. त्या सर्व दसरा चौक मैदानावर उभ्या करण्यात आल्या. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, शिवाजी पूल, राजारामपुरी, शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर चौक आदी ठिकाणी सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर