शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:10 IST

अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईच्या बडग्यामुळे वाहनधारकांच्या वेगमर्यादेवरही चाप लावण्यात या शाखेला यश आले आहे.

ठळक मुद्देसुसाट वाहनधारकांकडून २१ लाखांचा दंड वसूलवाहतूक शाखेची मोहीम : स्पीडगनमुळे कारवाईस ‘स्पीड’

सचिन भोसले कोल्हापूर : अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईच्या बडग्यामुळे वाहनधारकांच्या वेगमर्यादेवरही चाप लावण्यात या शाखेला यश आले आहे.रस्ते अपघातात गंभीर जखमी व मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवून प्रत्येक वाहनचालकाचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत.

याच धर्तीवर आॅक्टोबर २०१९ मध्ये राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील प्रत्येक शहरामध्ये स्पीडगन व्हॅन तैनात केल्या आहेत. यातील एक व्हॅन कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडेही दिली आहे.

चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांची लेसर किरणांद्वारे टिंट तपासणी करणारे मीटर, वेगतपासणी करणारी ‘व्हिडिओ बेस्ड लेसर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम’, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांच्या बोलण्यावरून ते मद्यप्राशन करून वाहन चालवीत आहेत का, याचीही पाहणी या यंत्राद्वारे केली जात आहे.

ही सर्व यंत्रणा या एकाच वाहनात आहे. त्या वाहनांद्वारे डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० या दोन महिन्यांत २११५ जणांवर कारवाई करण्यात आली. या स्पीडगन वाहनामुळे वेगमर्यादा न सांभाळणाऱ्या वाहनधारकांना काही प्रमाणात जरब बसली आहे.प्रत्येकी एक हजाराचा दंडशहरातील विविध रस्ते, जसे की दुभाजक असलेले रस्ते, चिंचोळे रस्ते, अधिक रहदारीचे रस्ते अशा वर्गीकरणानुसार प्रतितास ४०, ६० आणि ७० किलोमीटर अशी वेगमर्यादा दुचाकी, चारचाकी वाहनांकरिता निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार त्या वाहनाचा वेगही या यंत्रात नोंदविला जात आहे. या वाहनधारकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला.वाहतूक शाखेतर्फेही सुसाट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे; परंतु कोल्हापुरात कुठेच कोणत्या रस्त्यावर प्रतिताशी किती वेगाने वाहने चालवावे, याच्या सूचना लावलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालक त्याबाबत अनभिज्ञ असतात; परंतु तरीही दंडवसुली केली जाते.

स्पीडगन व्हॅनद्वारे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांना नक्कीच चाप बसला आहे. लोकांनी दंड भरण्यापेक्षा सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य द्यावे, असाच आमचा प्रयत्न आहे.- वसंत बाबर,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर

 

टॅग्स :bikeबाईकkolhapurकोल्हापूर