शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

Kolhapur: शेतकरी संघाला आर्थिक मदत हा तात्पुरता दिलासा, मार्केटिंगचे नवतंत्रज्ञान अवलंबण्याची गरज

By राजाराम लोंढे | Updated: January 7, 2025 13:21 IST

संघाचा खर्च म्हणजे म्हशीपेक्षा रेडकू मोठे

राजाराम लोंढेकोल्हापूर : शेतकरी संघ नोव्हेंबर २०२४ अखेर १९ कोटीने तोट्यात आहे. जिल्हा बँकेसह इतर वित्तीय संस्थांकडून व्यवसायासाठी सुमारे दोन कोटी रुपये अर्थसहाय मागणी केली असली तरी अशा प्रकारची मदत म्हणजे आजचे मरण उद्यावर एवढेच होणार आहे. संघाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढायचे झाल्यास व्यवस्थापनाला शिस्त लावण्याची गरज आहे. परंतु नेतेमंडळी नेमके तेच न करता कुणालाही न दुखावण्याचे त्यांचे धोरण आहे. त्याचाच फटका संघ गर्तेत जायला बसत आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर संघ १९ कोटीने तोट्यात आहे. त्यामुळे पारंपरिक मार्केटिंगची पद्धत बदलून ग्राहकांच्या गरजा ओळखून नव्याने विश्वास निर्माण करण्याचे आव्हान संघाच्या संचालक मंडळावर राहणार आहे.काही मंडळींच्या चुकीच्या कारभारामुळे संघ अडचणीत आला, पण आता संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. संघ वाचला तरच तुमच्या खुर्च्या वाचणार आहेत, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे. यासाठी उच्चशिक्षित व मार्केटिंगचे ज्ञान असणाऱ्या कार्यकारी संचालकाची नेमणूक करून संचालकांनी निस्वार्थीपणे काम करायला हवे. नेत्यांनी एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश संचालकांना दिले होते. पण, अद्याप त्यांची नेमणूकही केलेली नाही. संचालक मंडळातील अंतर्गत हेवे-दाव्यांसह इतर गोष्टींतील रस कमी करून हा संघ वाचवण्याचे शिवधनुष्य संचालकांना घ्यावे लागेल. एकीकडे सर्व शाखा नफ्यात आणण्याबरोबरच संचित तोटा कमी करण्याचे आव्हान असणार आहे. 

संघाचा खर्च म्हणजे म्हशीपेक्षा रेडकू मोठेएप्रिल ते नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा ताळेबंद पाहिला तर आठ महिन्यांत संघाचे उत्पन्न ७ कोटी ८ लाख रुपये तर खर्च ७ कोटी २८ लाख रुपये झाला आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा २० लाखाने खर्च वाढला आहे. यावरून, संघाची आगामी काळातील दिशा स्पष्ट होते. मागील वर्षी म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत तब्बल १० कोटीने व्यवसाय कमी झाला आहे.

संघ बाहेर काढण्यासाठी हे करा..

  • तातडीने भागभांडवल उपलब्ध करून माल खरेदी करणे
  • बाजारपेठेतील चढ उताराचा अंदाज घेऊन खरेदी-विक्री करावी.
  • कोट्यवधीची उधारी वसुलीला संचालकांनी प्राधान्य द्यावे
  • अपहाराच्या रकमा वसुलीबाबत ‘नरोबा कुंजरोवा‘ची भूमिका सोडली पाहिजे
  • शाखांनिहाय पुरेसे कर्मचारी देत असताना त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण द्यावे.
  • ग्राहकांना विश्वास देऊन उत्पन्नात वाढ आणि खर्चाला कात्री लावण्याची गरज

संघाच्या जागा विकसित करण्याची गरजस्वर्गीय बाबा नेसरीकर यांनी संघाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी विविध विभाग सुरू केले. व्यापारात कधीही एखादा विभाग अडचणीत येतो, त्यावेळी इतर विभागांनी सावरायचे असते. ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. संघाच्या मालकीच्या १४ गोडाउनसह इतर जागा आहेत. तिथे स्वत:चा व्यवसाय सुरू केला, तर उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते.

दृष्टीक्षेपात शेतकरी संघाची नोव्हेंबर २०२४ अखेर आर्थिक स्थिती -

  • कर्ज देणे - ५.६५ कोटी
  • व्यापारी देणे - ३.०२ कोटी
  • ठेव देणे - १.२३ कोटी
  • बिल्स देणे - ०.२० कोटी
  • सिक्युरिटी डिपॉझिट देणे - ०.४९ कोटी
  • बिल्स कोर्ट दावा येणे - १.३० कोटी
  • बिल्स इतर येणे - २.६७ कोटी
  • व्यापारी येणे - ०.८० कोटी
  • चालू तोटा - ०.१९ कोटी
  • संचित तोटा - ३.८१ कोटी
टॅग्स :kolhapurकोल्हापूर