शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

...अखेर बेनिक्रेच्या कोरड्या तलावात अवतरली ‘वेदगंगा’

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

चाचणी यशस्वी : २९ जानेवारीला पाणी पूजन, ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता; सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र येणार ओलिताखाली

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे  --शेतीसाठी लांबच; पिण्याच्या पाण्याचेही दुर्भीक्ष्य असणाऱ्या आणि धार्मिक पूजेसाठी उसाचे कांडेही वेदगंगा नदीकाठावरील गावांतून आणावे लागणाऱ्या बेनिक्रे (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी एकजुटीने सुरपली येथील वेदगंगा नदीतून पाणी योजनेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. यासाठी शेतकऱ्यांनीच कर्जाचा डोंगर पेलून येणऱ्या संकटांनाही खंबीरपणे सामोरे जात ही योजना यशस्वी केली.या पाणी योजनेचे पाणी पूजन २९ जानेवारीला होणार असले तरी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाणी चाचणी घेण्यात आली. या चाचणीवेळी कोणतीही तक्रार उद्भवली नसून, सुमारे सव्वा तास पडणाऱ्या या योजनेच्या पाण्याकडे पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांची तृप्तता झाली.बेनिक्रेकरांची तहान भागविण्याच्या दृष्टीने १९८५ मध्ये ६४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा प्रकल्प झाला. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने डाव्या व उजव्या कालव्याची खुदाईही करण्यात आली. मात्र, या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतच नव्हता. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत होता. उभी पिके पाण्याअभावी वाळली तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.त्यामुळे येथील ४५० शेतकऱ्यांनी बारमाही वाहणाऱ्या गावच्या उत्तरेकडील दिशेला डोंगरापलीकडून वाहणाऱ्या वेदगंगा नदीतून पाणी योजना करण्याचा मनोदय केला. या स्वप्नपूर्तीसाठी २०१३ मध्ये या शेतकऱ्यांनी आपले सातबारा गहाण देऊन बँक आॅफ इंडियाकडून सुमारे सव्वातीन कोटींचे कर्ज घेतले. यातून सुरुपलीजवळील नागरिकांपासून काम सुरू झाले.मात्र, बेनिक्रेच्या हद्दीत असणाऱ्या केंद्रीय वनविभागाने खुदाईला परवानगी देण्यास वर्षभराचा विलंब लावला. तरीही या शेतकऱ्यांनी आस सोडली नाही. जोतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार गत महिन्यात वनविभागानेही खुदाईला परवानगी दिली आणि अखेर ही योजना पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना यश आले. यामध्ये अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करून व्यवस्थापनात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून पाच लाखांचे पारितोषिक पटकाविणाऱ्या जोतिर्लिंग संस्थेचेही मोठे योगदान आहे.दरम्यान, या योजनेमुळे येथील सुमारे अडीच हजार एकरांहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २९) ग्रामस्थ विधिवतपणे या पाण्याचे पूजन करून ग्रामदैवतांना सवाद्य पाणी घालणार आहेत.योजना अडीच वर्षे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत होता. चाचणी यशस्वी झाल्याने दडपण मुक्त झालो आहे.-आण्णासाहेब वाडकरअध्यक्ष, जोतिर्लिंग पाणी वापर संस्थाबेनिक्रेतील शेतीला आता यापुढे शाश्वत पाणी मिळणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह त्यांच्या पुढच्या पिढीला रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागणार नाही. - बाळासो मगदूम, मारुती जाधव, शेतकरी, बेनिक्रेही पाणी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारी आहे. तसेच महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण ही आपोआप थांबणार आहे. - सरिता चौगुले, उपसरपंच, बेनिक्रे