शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Kolhapur: वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त सापडला, मुख्यमंत्र्यांऐवजी उद्या सांस्कृतिकमंत्री करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:29 IST

प्रदर्शनात २३५ शिवकालीन शस्त्रे

कोल्हापूर : ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे भरवण्यात येणाऱ्या ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांऐवजी उद्या (मंगळवार, दि.२८ ऑक्टोबर रोजी) सांस्कृतिकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन आठ महिने कोल्हापुरात सुरू राहणार आहे.‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनासाठी ६ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून प्रदर्शन दालनासह विविध कामे पूर्ण झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली आहेत. सातारा येथे दि.२० जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत, तर नागपूर येथे दि.१ फेब्रुवारी दि.३० सप्टेंबरपर्यंत त्याचे प्रदर्शन भरवले होते. आता ही वाघनखं कोल्हापुरात आली असून, त्याचे प्रदर्शन यापुढे ८ महिने राहणार आहे. सकाळी १०:४५ वाजता होणाऱ्या या सोहळ्याला खासदार शाहू छत्रपती, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संभाजीराजे छत्रपती, प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे शाही सदस्यही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे उपस्थित राहणार आहेत.प्रदर्शनात २३५ शिवकालीन शस्त्रेया प्रदर्शनात शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांच्याकडून राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या शिवकालीन शस्त्रांपैकी तलवारी, धोप, बुरूज, पट्टा, कट्यारी, ढाल, धनुष्यबाण, खंजीर, कुऱ्हाडी, बंदुकी, अशी २३५ शस्त्रेही पाहायला मिळणार आहेत. लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहूंचा हत्तीचा रथ व घोड्यांची बग्गी सज्ज आहे. ‘सी’ इमारतीत प्रवेश-वाघनखं आणि शस्त्रांची पाहणी, राजर्षी शाहू जन्मस्थळ, जन्मस्थळातील संग्रहालय, ‘डी’ इमारतीतील संग्रहालय, तसेच राजर्षी शाहूंवरील माहितीपट, होलिग्राफी शो, असे या प्रदर्शनाचे स्वरूप असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Tiger claw exhibition finally opens, Minister to inaugurate.

Web Summary : The 'Shivshastra Shouryagatha' exhibition, featuring tiger claws from London, opens in Kolhapur. Cultural Minister Ashish Shelar will inaugurate it. The exhibition showcases 235 Shivकालीन weapons for eight months, supported by a ₹6.76 crore fund.