चित्रपट महामंडळातील वाद पेटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:01 AM2019-11-19T01:01:26+5:302019-11-19T01:01:32+5:30

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणातून अभिनेत्री छाया सांगावकर यांनी नोंद केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून चित्रपट महामंडळाचे ...

Film corporation controversy will stir! | चित्रपट महामंडळातील वाद पेटणार!

चित्रपट महामंडळातील वाद पेटणार!

Next

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणातून अभिनेत्री छाया सांगावकर यांनी नोंद केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून चित्रपट महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता झाली.
या निकालानंतर सोमवारी महामंडळाच्या कार्यालयासमोर महामंडळाच्याच तिघा सदस्यांच्या निषेधाचा फलक काही कामगार व चित्रपट व्यावसायिकांनी लावला. सायंकाळी हा फलक विरोधी गटातील काहींनी जाळून टाकला. या प्रकरणातून महामंडळातील किळसवाण्या राजकारणाचेच प्रदर्शन शहरवासीयांना झाले.
घडले ते असे : चित्रपट महामंडळाच्या अंतर्गत राजकारणातून ३० जुलै २०१४ ला अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याचा निकाल १४ आॅक्टोबरला जाहीर झाला व त्यामध्ये अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालाची प्रत दोन दिवसांपूर्वी मिळाल्यावर रविवारी अ‍ॅड. प्रकाश मोरे व अष्टेकर यांनी पत्रकार परिषद घेवून निकालाची माहिती दिली. या घटनेविरोधात छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात २५ लाख रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याबरोबरच फौजदारी गुन्हाही नोंद केल्याचे सांगितले. महामंडळाची बदनामी करणाऱ्या या तिघांचेही सभासदत्व रद्द करावे, अशी त्यांनी मागणी केली. हा विषय येथेच थांबला नाही.
सोमवारी सकाळी महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयाच्या दारातच या घटनेला कारणीभूत असलेल्या सांगावकर, नलवडे व पन्हाळकर या तिघांच्याही छायाचित्रासह निषेध करणारा फलक काही चित्रपट व्यावसायिक व कामगारांनी लावला. सांगावकर यांना पुन्हा सदस्य करून घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष व कार्यकारिणीचाही निषेध असाही उल्लेख त्या फलकावर होता. महामंडळासमोरील रस्त्यावरून जाणाºया शहरवासियांत या फलकाची चांगलीच चर्चा झाली. ही बाब कळल्यानंतर विरोधातील चित्रपट व्यावसायिकांनी सायंकाळी हा फलक काढून पेट्रोल टाकून तिथेच जाळून टाकला. या साºया घडामोडीतून महामंडळातील टोकाच्या राजकीय संघर्षाचे दर्शन झाले.

Web Title: Film corporation controversy will stir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.