शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त, महापालिकेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:05 IST

Muncipal Corporation LbtTax Kolhapur- स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) असेसमेंट करण्याची वारंवार संधी देऊनही व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या नोटिसा धुडकावून लावल्या असल्या, तरी यापुढे मात्र व्यापाऱ्यांची खैर नाही. जे व्यापारी स्वत: असेसमेंट करून पंधरा दिवसांत करांचा भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर एकतर्फी कराची आकारणी करून त्याच्या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देएलबीटी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त, महापालिकेचा इशारा व्यापाऱ्यांची आता खैर नाही, आक्रमक पवित्रा

कोल्हापूर : स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) असेसमेंट करण्याची वारंवार संधी देऊनही व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या नोटिसा धुडकावून लावल्या असल्या, तरी यापुढे मात्र व्यापाऱ्यांची खैर नाही. जे व्यापारी स्वत: असेसमेंट करून पंधरा दिवसांत करांचा भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर एकतर्फी कराची आकारणी करून त्याच्या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची बूज राखत सरकारने जकात रद्द केल्यानंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. ३० जून २०११ स्थानिक संस्था कराची अमंलबजावणी करण्यात आली होती. पुढे ही अंमलबजावणी दि.३१ जुलै २०१५ अखेर झाली. इन्स्पेक्टर राज निर्माण झाल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करालाही विरोध केला. शेवटी हा एलबीटीही रद्द करण्यात आला. परंतु एलबीटी लागू असणाऱ्या काळात अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाच्या कराचे निर्धारण केले नाही. तसेच योग्य पध्दतीने करही भरला नाही.यामध्ये रक्कम रुपये ५० कोटींच्या वर ज्यांची वार्षिक उलाढाल आहे, तसेच देशी-विदेशी मद्यविक्री करणारे व्यापारी आहेत, त्यांचा करनिर्धारण पूर्ण करण्याचा कालावधी दि. ३० जून २०१७ अखेर होता. या कालावधीमध्ये शासनाच्या आदेशानुसार स्थानिक संस्था कराचे करनिर्धारण पूर्ण करून घेतलेले नाही, अशा व्यापाऱ्यांसाठी महापालिकेने वेळोवेळी शिबिरांचे आयोजन केले. संबधित व्यापा-यांना नोटीस लागू करण्यात आल्या होत्या. परंतु या शिबिराला व्यापा-यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता आक्रमक कारवाई करण्याचे ठरविले आहे.दि. ३० जून २०११ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीतील ज्या व्यापा-यांनी करनिर्धारण करून घेतलेले नाही, त्या व्यापा-यांनी करनिर्धारणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करून नियमाप्रमाणे करनिर्धारण पूर्ण करून घ्यावे व कराची रक्कम भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे महानगपालिकेच्याच्यावतीने करण्यात आले आहे.जे व्यापारी, दुकानदार कारनिर्धारण करून घेणार नाहीत, त्यांच्यावर एकतर्फी आदेश लागू करण्यात येतील. तसेच आदेश झाल्यानंतर पंधरा दिवसांत कराची रक्कम भरणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार मालमत्ता जप्त, बँक खाती सील करून स्थानिक संस्था कराची वसुली करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाTaxकरkolhapurकोल्हापूर