शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

इडियट, गेट आऊट... यांच्यावर एफआरआय दाखल करा -: सीईओंचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:44 IST

इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला.

ठळक मुद्देवाटल्यास मी शाहूवाडीत येतो. हे आधी सांगूनही आंदोलन का केले? हा त्यांचा प्रश्न होता.

कोल्हापूर : शाळेत शिक्षक नाहीत. त्यामुळे लवकर शिक्षक द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांना पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी दुपारी रुद्रावतार धारण केला. इडियट..., गेट आऊट... यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणणाऱ्या मित्तल यांच्यासमोर पालकांसमवेत आलेले जिल्हा परिषद सदस्यही हतबल झाले. दुपारी चारच्या दरम्यान मित्तल यांच्या दालनासमोरच हा प्रकार घडला.

शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे येथील ग्रामपंचायत सदस्य, पालक शिक्षकांच्या मागणीसाठी कासारी खोरा शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातून दुपारी तीननंतर जिल्हा परिषदेत आले. या शाळेत चारही वर्गांचे ५0 विद्यार्थी असून, चार शिक्षकांची पदे मंजूर असताना एकही शिक्षक हजर नसल्याने पालक आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेत घेऊन आले होते. येताना त्यांनी युनिफॉर्मवरील विद्यार्थ्यंानाही बरोबर आणले होते. यावेळी मित्तल हे विभागप्रमुखांची बैठक घेत होते. त्यांना दालनासमोर आंदोलन सुरू असल्याचे समजले.

ते तातडीने खाली आले. त्यांना पाहताच ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा सुरू झाल्या. यावेळी संतापलेल्या मित्तल यांनी यातील एका ग्रामस्थाकडे तुमची मुले या शाळेत आहेत का, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितले. ‘मग इथे का आलात, राजकारण करता का’ असे विचारत मित्तल यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मित्तल यांनी त्यांचाच पंचनामा केला. पंचायत समितीचे सदस्य दिलीप पाटील यावेळी अशोक पाटील, संदीप धनवडे, बाजीराव गुरव, आनंदा लाड आदी उपस्थित होते.३ आॅगस्टनंतर तुम्हाला शिक्षक देतोया खडाजंगीनंतर मित्तल यांच्या दालनामध्ये सदस्य बसले. यावेळी मित्तल म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे मला नोटीस दिली आहे तरीही मी दिलेले शिक्षक माघारी बोलावले नाहीत. ३१ जुलैला विभागीय आयुक्तांकडे शिक्षकांची सुनावणी आहे. त्यामध्ये जो निर्णय होईल त्यानुसार ३ आॅगस्टनंतर तुम्हाला मी शिक्षक देतो. वाटल्यास मी शाहूवाडीत येतो. हे आधी सांगूनही आंदोलन का केले? हा त्यांचा प्रश्न होता.एफआयआर दाखल करण्यामुळे प्रश्न सुटणार नाही, असे हंबीरराव पाटील सांगत होते. त्यावेळी मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो. तुमची विभागीय आयुक्तांकडे तक्रार करेन, असा इशारा मित्तल यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्याला तुमचे सदस्यत्व आजपासून रद्द, असेही मित्तल सुनावले. 

अमन मित्तल यांचे वागणे अतिशय चुकीचे होते. त्यांचा काय गैरसमज झाला आहे, हे माहीत नाही. मात्र, सर्वसामान्य पालक त्यांच्या मुलांचे शिक्षकांअभावी नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक मागणीसाठी आले असताना त्यांच्याशी जबाबदार पदावरील अधिकाºयाने असे वागणे शोभत नाही.- हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य, शाहूवाडी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद