शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

Kolhapur: ‘न्यूटन’च्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अन्यथा..; शिवसेनेचा इशारा

By संदीप आडनाईक | Published: March 19, 2024 3:34 PM

बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचे सिध्द

कोल्हापूर : वादग्रस्त न्यूटन एंटरप्राईजेस या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना असतानाही अद्याप संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याचे कारण स्पष्ट करावे, अन्यथा न्यायालयात खेचावे लागेल असा इशारा मंगळवारी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना दिला. सीपीआरमध्ये शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी सीपीआरच्या अधिष्ठातांची भेट घेतली.न्यूटन इंटरप्राईजेस कंपनीचा परवाना बनावट असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने लेखी स्वरुपाच्या सूचना दिल्या, तरी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदाराला काम देऊ नये असा अभिप्राय दिला असतानाही कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी केली. शिवसेनेने या विषयावर हल्लाबोल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या, त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना असताना अद्यापपर्यंत संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल शिवसेनेने केला.दहा कोटी रुपयांची गरजेनुसार खरेदी न करता अनावश्यक, मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळते म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करणाऱ्या प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व त्यांना साथ देणाऱ्या यंत्रणेचा बुरखा फाडून कोल्हापुरातील संबंधित खात्याचे मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ बंदोबस्त करावा अशी मागणी या पक्षाने केली आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, दिनेश साळोखे, विराज ओतारी, महादेव कुकडे, सूरज कांबळे, संजय जाधव, हर्षल पाटील, अभिजीत बुकशेठ, प्रवीण पालव, माधुरी जाधव, सुनील कानूरकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयShiv Senaशिवसेना