शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर ब्रँड’खाली कर्नाटकी गूळ विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:22 IST

शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील

कोल्हापूर : कर्नाटकातील गूळ येथे आणून तो ‘कोल्हापूर ब्रँड’खाली विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. गुळाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तातडीने उभा करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गुळाच्या गुणवत्तेनुसारच पैसे मिळतील. कर्नाटकातील गुळाला आत प्रवेशच द्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.गुळाला किमान प्रति क्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला पाहिजे, यासाठी मंगळवारपासून शेतकऱ्यांनी सौदेच काढू दिलेले नाहीत. गेली चार दिवस हा पेच निर्माण झाला होता, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकरी व समिती प्रशासनाशी चर्चा केली. कर्नाटकातील समितीत येणारी आवक थांबवली तर गुळाच्या दरात वाढ होईल, यावर शेतकरी ठाम होते.व्यापाऱ्यांची बिले तपासली तरी गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकातील गूळ येथे किती आला, हे उघड होईल. असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून, बाहेरील गूळ कोल्हापुरी म्हणून कोणी विकत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर सोमवार (दि. २८) पासून भरारी पथकासह प्रवेशद्वारावरूनच बाहेरील गुळाला प्रवेश देऊ नका, अशी सूचना त्यांनी समिती प्रशासनाला दिली. यावेळी समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील व शेतकरी उपस्थित होते.

प्रयोगशाळेवरही मर्यादा....गुळाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी समितीने प्रयोगशाळा तयार करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. याबाबत त्यांनी गूळ संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रयोगशाळा तयार केली तर त्याचा अहवाल तातडीने मिळत नसल्याने जागेवर दर निश्चित होणार नाही.

व्यापाऱ्यांच्या ‘जीभेवर’च विश्वासव्यापारी गुळाच्या रव्यावर चाकू मारून तो जीभेवर ठेवतात, मग दर जाहीर करतात. या पारंपरिक पद्धतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले असता आमचा व्यापाऱ्यांवर विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांची फिरकीकर्नाटकातून सध्या व्यापारीच गूळ आणत आहेत. मात्र, पुढे शेतकऱ्यांनीच गूळ आणून तो येथे विकू लागले तर तुम्ही रोखणार कसे? अशी फिरकी जिल्हाधिकारी रेखावार यांनी शेतकऱ्यांची घेतली.

भरारी पथकाची सूत्रे सूर्यवंशींच्या हाती द्यासमितीचे उपसचिव राहुल सूर्यवंशी हे आक्रमक असून, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारांना चाप लावला होता. भरारी पथकाची सूत्रे त्यांच्यात हातात द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी