शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपमध्येच पुन्हा लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

आरक्षणामुळे उमेदवारांची वानवा : अमर पाटील कळंबा : एकीकडे पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून बसले ...

आरक्षणामुळे उमेदवारांची वानवा :

अमर पाटील

कळंबा : एकीकडे पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून बसले असले, तरी प्रभाग क्रमांक ७१ रंकाळा तलाव येथे मात्र सक्षम महिला उमेदवार शोधताना सर्वच पक्षांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ७१ रंकाळा तलाव हा यंदाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गेल्या वर्षभरापासून तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची निराशा झाली आहे. त्यामुळे या प्रभागात सक्षम महिला उमेदवार शोधून त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आता नेते व कार्यकर्त्यांवर आली आहे. या प्रभागावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली, तरी पुन्हा एकदा काँग्रेस - भाजपमध्येच याठिकाणी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या प्रभागातून शिवसेनेचे विजय पावसकर यांनी दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर तर एकदा अपक्ष निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रीक केली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. तब्बल वीस वर्षांनंतर काँग्रेसने येथे गतनिवडणुकीत विजय मिळवला होता. पंचवीस लहान-मोठ्या कॉलन्यांमध्ये विस्तारलेल्या या प्रभागात उच्चभ्रू व सुशिक्षित वस्तीचे प्राबल्य जास्त असल्याने बऱ्याचदा निवडणूक व्यक्तीकेंद्रीत आणि विकासाच्या मुद्द्यांवर निर्णायक होते. प्रभागातील मोठ्या नागरी वस्त्या असणाऱ्या हरिओम नगर, मोहिते पार्क, पोवार कॉलनी, टाकळकर कॉलनी येथील मतदान निर्णायक ठरते.

गतवेळच्या निवडणुकीत हक्काचा सानेगुरुजी वसाहत प्रभाग इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी या प्रभागातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. खरी लढत काँग्रेसचे शारंगधर देशमुख व भाजपच्या अमोल पालोजी यांच्यात होऊन काँग्रेसचे शारंगधर देशमुख ८५८ इतक्या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यावेळी अन्य उमेदवारांना अपेक्षित मतेही मिळवता आली नव्हती. दरम्यान, यंदा या प्रभागात काँग्रेसकडून पल्लवी बोळाईकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर भाजपकडून अमोल पालोजी यांच्या पत्नी अनुश्री पालोजी इच्छुक आहेत. याखेरीज उद्योजक राहुल काळे यांच्या पत्नी आरती काळे याही रिंगणात उतरल्या आहेत. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या प्रभागात शिवसेना सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. सर्वच पक्षांनी या प्रभागावर लक्ष केंद्रीत केले असले तरी काँग्रेस-भाजपमध्येच निर्णायक लढत होण्याची शक्यता जास्त आहे.

गतनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : शारंगधर देशमुख काँग्रेस- २,०११, अमोल पालोजी भाजप - १,१५४, राजेंद्र पाटील - शिवसेना -३०२

संदेश कचरे - रासप - ६६, अजय कोराने - राष्ट्रवादी काँग्रेस -

प्रभागातील समस्या : १) हरिओम नगर या मोठ्या नागरी वस्तीतील अविकसित मुख्य व अंतर्गत रस्ते २) अंबाई टॅन्क परिसरातील रहिवाशांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रलंबित प्रश्न ३) क्रेशेर चौक ते रंकाळा तलावमार्गे सायलेंट झोनमधील नियमबाह्य होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतूककोंडी व किरकोळ अपघात ४) रंकाळा तलाव परिसरातील नागरी वस्तीत कोसळणाऱ्या जुनाट वृक्षांची समस्या ५) रंकाळा तलाव परिसरातील पर्यटक व नागरिकांसाठी उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय बंदावस्थेत आहे.

सोडवलेले प्रश्न १) संपूर्ण प्रभागात पेव्हर पध्दतीने रस्ते विकसित २) ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची समस्येचे पहिले निराकरण करून नंतर रस्ते विकसित, खड्डेमुक्त प्रभाग ३) नियमित कचरा उठाव, कोंडाळामुक्त प्रभाग ४) संपूर्ण प्रभागात एलईडी हायमास्ट पथदिवे ५) रंकाळा परिसरातील सात धोकादायक खाणींवर संरक्षक कठडे उभारणी ६) क्रेशेर चौक तसेच इराणी खाणीचे सुशोभिकरण ७) पंधरा आरक्षित जागा विविध कारणास्तव विकसित ८) रंकाळा तलाव परिसरात चार हजार वृक्षांचे रोपण व संवर्धन, बटरफ्लाय व बोटॉनिकल गार्डनची उभारणी करण्यात आली.

कोट : गेल्या पाच वर्षात बारा कोटींचा विकासनिधी उपलब्ध करून परिणामकारक विकासकामे प्रभागात केली. ज्यामुळे स्मार्ट, समस्यामुक्त प्रभाग निर्मितीत यश मिळाले आहे. अंबाई जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी दीड कोटींचे काम प्रलंबित राहिले याची खंत असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू. - शारंगधर देशमुख, नगरसेवक

फोटो : १२ प्रभाग क्रमांक ७१

१) हरिओम नगर येथील मोठ्या नागरी वस्तीतील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते विकसित झाले नाहीत. २) पेव्हर पध्दतीने रस्ते विकसित करण्यात आलेला एकमेव प्रभाग.