कऱ्हाड : कऱ्हाड आगारातील फलाटावर विनाफलकाचीच गाडी उभी केली जात असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर अशा घडणाऱ्या प्रकाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत होती. कऱ्हाड आगारातील चालकांकडून फलक न लावताच एस. टी. बस आगारातून बाहेर घेऊन गेल्यास तसेच रस्त्यावरून जाताना दिसल्यास याविषयी तक्रार करावी. त्या चालकावर तत्काळ पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल, तसा आदेश आगारप्रमुखांकडून काढण्यात आला असल्याने आता फलक लावूनच गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.कऱ्हाड आगारामध्ये आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा फायदा घेत एस. टी. बसचालकांकडून घेतला जात होता. त्यांच्याकडून आगारात विनाफलकांच्या गाड्या लावल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहनचालकांच्या आळशी स्वभावामुळे प्रवाशांना अनेक समस्या व अडचणींना सामोरं जावं लागत होतं. एस. टी. बसचालकांकडून केल्या जाणाऱ्या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांकडून माहिती घेतली होती. त्यांच्याकडून या प्रकाराबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. या घडत असलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत तसेच प्रवासी व विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यविषयी ‘लोकमत’ने ‘प्रवाशांसाठीकायपण.. बिनफलकाच्याा गाड्याही’ व ‘ही गाडी कुंची हाय रं बाबा..’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. आगारप्रमुखांकडून याची दखल घेऊन अशा नियम मोडणाऱ्या व मनमानी करणाऱ्या बसचालकांना शिस्त लावण्यासाठी आदेश काढला आहे.कऱ्हाड आगारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विनानावाच्या फलकाने एस. टी. बसची वाहतूक केली जात होती. त्यामुळे आगारामध्ये या घडत असलेल्या प्रकाराबाबत प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते. या प्रकाराबाबत प्रवाशांकडून तक्रारीही केल्या जात होत्या. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल आगार प्रमुखांकडून घेण्यात आली आहे. जर एस. टी. वाहनचालकाकडून गाडीवर फलक लावले गेले नाहीत तर त्याच्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसा आदेश काढण्यात आला असून, तशा सूचनाही एस. टी. वाहनचालक व वाहकांना आगारप्रमुखांकडून करण्यात आल्या आहेत.आता या आदेशामुळे आळशी वाहनचालकांना चांगलाच चाप बसणार आहे. त्यांच्याकडून मोडल्या जाणाऱ्या नियमांची अंमलबजावणी होण्यास या आदेशामुळे मदत होणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या गैरसोयीसाठी धावणारी एस. टी. आता पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार असल्याने प्रवाशांचा एस. टी. महामंडळाकडे बघण्याचा असलला पूर्वीचा दृष्टिकोन यामुळे नक्की बदलेल. (प्रतिनिधी) आता दिसणार फलकाच्या गाड्या कऱ्हाड आगारामधील आळशी एस. टी चालकांकडून फलक लावले न गेल्यास त्यांच्यावर रितसर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आगारप्रमुखांनी काढले आहे. त्यामुळे आता आगारातून गाडीला फलक लावूनच गाडी बाहेर काढली जाणार आहे. फलकाच्या केलेल्या सक्तीमुळे आता एस. टी. महामंडळाच्या गाड्या फलक लावलेल्या दिसणार आहे.तक्रार करा, कारवाई नक्की करूकऱ्हाड आगारामध्ये विनाफलकाची गाडी फलाटावर चालकाकडून उभी केली असता, अथवा रस्त्यावरून फलक न लावताच प्रवाशांची वाहतूक करताना दिसल्यास त्याबाबत आमच्याकडे प्रवाशांनी तक्रार क रावी. त्या एस. टी. चालकावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - जे. के. पाटील, आगारप्रमुख, कऱ्हाड
फलक नसलेल्या एसटीला पाचशेचा दंड!
By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST