शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

‘हातकणंगले’ची वाया गेलेली पंधरा वर्षे : तालुक्याची प्रगती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:15 AM

या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ; अनेक प्रश्न प्रलंबित; सर्वाधिक शहरीकरणाचा मतदारसंघ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेलाआणि झपाट्याने विकसित झालेला तालुका म्हणून हातकणंगले तालुका ओळखला जातो. वारणा व पंचगंगा नदीच्या खोऱ्यात विखुरलेल्या या तालुक्यात हातकणंगले आणिइचलकरंजी हे दोन मतदारसंघ येतात. पण, गेल्या १५ वर्षांत येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सक्षम नेत्यांच्या अभावामुळे विविध पायाभूत सुविधांची वानवा जाणवते.

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी, पेठवडगाव, हुपरी या नगरपालिका, तर हातकणंगले ही नवीन नगरपंचायत आहे. जिल्ह्यातील हा एकमेव तालुका आहे, ज्यामध्ये चार नगरपालिका, तर शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी इंडस्ट्रीज, आवाडे टेक्सटाईल पार्क, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि कागल पंचतारांकित एमआयडीसीचा काही भाग आहे. पण, पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा तालुका पिछाडीवर राहत असल्याचे चित्र दिसते. सांगली-शिरोली रस्त्याचा प्रश्न गेली १० वर्षे रखडला आहे. हा रस्ता झाला असला तरी कामे अजूनही प्रलंबित असून, जो रस्ता झाला आहे तो देखील खराब आहे.

यासाठी आमदारांनी आंदोलने केली; पण सत्ता आल्यावर त्यांना हे काम पूर्ण करता आले नाही. त्याचप्रमाणे तालुका क्रीडा संकुल २००३ मध्ये मंजूर झाले, तर २००९ मध्ये त्याचा निधी वाढविण्यात आला. पण, आजअखेर हे संकुल भिजत पडले आहे. औद्योगिक वसाहतीत वडगाव येथील

एकही नवा प्रकल्प उभारला गेला नाही. वाढीव वीजदरामुळे फौंड्री उद्योग देखील अडचणीत आला आहे. शिरोलीत मार्बल आणि टाईल्स उद्योग बहरला आहे; पण त्यासाठी कोणतेही नियोजन नाही. इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांचा मिळून मतदारसंघ आहे. या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. गेल्या दहा वर्षांत एकही नवीन सूतगिरणी भागात सुरू झालेली नाही. २०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीने थैमान घातल्यानंतर प्रदूषित पाणीप्रश्न ऐरणीवर आला; पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. वारणा अमृत योजनेचे घोंगडे भिजत पडले आहे.आरोग्य सुविधांचा बोजवारामोठी लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघांत आरोग्य सुविधांची दाणादाण उडाली आहे. याठिकाणी एकही उपजिल्हा रुग्णालय नाही. आयजीएम रुग्णालय, बळवंतराव यादव रुग्णालय याची अवस्था बघून आज तेथे एकही रुग्ण जाणार नाही. येथील लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत कधीच आवाज उठवला नाही, हे दुर्दैव. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण बघतट्रॉमा सेंटरची नितांत गरज असूनही याबाबत कधी पाठपुरावा होताना दिसत नाही.शैक्षणिक हब, बेरोजगारी जादातालुक्यात विविध शैक्षणिक संस्था, निवासी शाळा, डीकेटीई, घोडावत इन्स्टिट्यूट, माने इन्स्टिट्यूट, डीवायपी शैक्षणिक संकुल, आदी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. येथे दरवर्षी हजारो युवक शिक्षण घेतात; पण त्यांना परिसरात रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. एमआयडीसीमध्ये फार कमी रोजगार मिळत आहे. तालुक्यात माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, फौंड्री, वाहन उद्योग वाढविण्याची सुवर्णसंधी असूनही लोकप्रतिनिधींच्या पातळीवर काहीच होत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण