शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खत उद्योगाचा ‘पिता’

By admin | Updated: October 6, 2015 00:31 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

विद्यापीठे व उद्योगधंदे यांनी हातात हात घालून विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य केले तर त्या राष्ट्राची प्रगती गतीने होते. आज भारतातील सर्व विद्यापीठे इनक्युबेशन सेंटर उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच विचाराने एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी एक संशोधक प्रयत्नरत होते. त्याकाळी पाव, औषध, वाइनरी तयार करण्यासाठी विद्यापीठे नसून ज्ञानदानासाठी आहेत, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने त्यांना सांगितले होते. मात्र, विद्यापीठातील अध्यापन चालू ठेवून त्यांनी बाहेर हा प्रयोग सुरू ठेवला. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात आपल्या कार्याने अजरामर झालेले संशोधक म्हणजे जस्टस वोन लिबिंग.जस्टस यांचा जन्म जर्मनीतील डर्मस्टॅट या गावात १२ मे १८०३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे हार्डवेअर, रंग साहित्याचे दुकान होते. रंग पाहून लहानपणापासून जस्टस यांना रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली. जस्टस तेरा वर्षांचे असताना युरोपमध्ये सर्वांत मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचे भयानक परिणाम पाहून जस्टस यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या परिणामांचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यात दिसतात.अभ्यासक्रम पूर्ण न करताच त्यांनी प्रशिक्षण उमेदवारी सुरू केली. त्यांचा खर्च वडिलांना परवडत नसल्याने ते परत आले. वडिलांसह दोन वर्षे काम केले, पुरेसे पैसे जमविले आणि बॉन विद्यापीठात ते रूजू झाले. वडिलांच्या व्यवसायातील साथीदार कार्ल कासनर यांच्यासह अध्ययन सुरू केले. कासनर यांनी बॉन विद्यापीठ सोडले. जस्टस यांनाही विद्यापीठ सोडावे लागले. पुढे त्यांनी इर्लांजन विद्यापीठात प्रवेश घेऊन रसायनशास्त्राचे ज्ञान घेण्यास सुरू केले. तिथे विद्यार्थी चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना विद्यापीठाने काढून टाकले. मात्र, अभ्यासातील प्रगतीमुळे त्यांना पीएच.डी. पूर्ण करण्याची संधी दिली. त्यांना २३ जून १८२३ रोजी इर्लांजन विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. जिसेन विद्यापीठात हंबोल्ट यांच्या सूचनेनुसार विशेष प्राध्यापक म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. मात्र, तिथे पूर्वीपासून काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांना असहकार सुरू केला. त्यांना प्रयोगशाळा वापरण्यास बंदी घातली व अध्यापनासाठी त्यांना कमी महत्त्वाचे कला शाखेचे विषय दिले. पुढे विरोध करणाऱ्या शिक्षकांपैकी एकाने आत्महत्या केली, तर दुसऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नियमित प्राध्यापक पदासाठी जस्टस यांनी अर्ज केला व १९२५ मध्ये ते नियमित प्राध्यापक झाले. त्यांचे अध्यापन प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांच्या आधारे असल्याने संपूर्ण युरोपभर त्यांची ओळख निर्माण झाली. विद्यापीठ व्यवस्थापनाने मात्र त्यांच्या या पद्धतीला विरोध केला. त्यामुळे त्यांनी बाहेर प्रयोगशाळा सुरू केल्या. पुढे दहा वर्षांनंतर जस्टस यांची अध्यापन पद्धती विद्यापीठाने स्वीकारली.जस्टस यांनी वनस्पतींची वाढ व पोषण या विषयावर संशोधन केले. वनस्पतींच्या वाढीसाठी आॅक्सिजन, हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे महत्त्व मोठे आहे. वनस्पतींना पुरेसा नायट्रोजन पुरविण्यासाठी अमोनिया व युरिया महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, याला प्रायोगिक निष्कर्षाची साथ नव्हती. जस्टस यांनी शेतीत प्रत्यक्ष प्रयोग केले नाहीत. मात्र, प्रयोगशाळेतील वाढ अभ्यासून वनस्पतींना विविध क्षारांची किती मात्रा देणे गरजेचे आहे, जास्त मात्रा दिल्यास काय परिणाम होतो, हे सांगितले. कृत्रिम खतांची मात्रा निश्चित करणाऱ्या या वैज्ञानिकास ‘खत उद्योगाचा पिता’ म्हणतात. त्यांनी पशुपालन आणि मांस व्यवसाय सुरू केला. मांसाची निगा राखण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले व लिबिंग मीट कंपनी सुरू केली. १८ एप्रिल १८७३ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, आजही त्यांच्याच रसायनशास्त्र प्रयोगशाळेची रचना अद्ययावत मानली जाते.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.