शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

घरफाळा भरणाऱ्यांचा सत्कार; थकबाकीदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:02 IST

CoronaVirus, muncipaltyCarportation, kolhapurnews प्रामाणिकपणे घरफाळा जमा करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार तर थकबाकीदारांवर कडक कारवाई, असा नवा फंडा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सुरू केला आहे.

ठळक मुद्देघरफाळा भरणाऱ्यांचा सत्कार; थकबाकीदारांवर कारवाईआयुक्तांचा नवा फंडा : वसुलीमध्ये हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा

कोल्हापूर : प्रामाणिकपणे घरफाळा जमा करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार तर थकबाकीदारांवर कडक कारवाई, असा नवा फंडा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सुरू केला आहे.

वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून महापालिकेची देय रक्कम तत्काळ भरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. महापालिकेच्या विविध विभागांचा वसुलीबाबत मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.मार्चची प्रतीक्षा करू नकाकोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने सर्व विभागप्रमुखांनी थकबाकी वसुलीचे काम प्रभावी करावे. मार्चअखेर वसुलीचे नियोजन आताच करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.आयुक्तांचे आदेश ..

  • पाणीपुरवठा विभागाने नोटिसीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी विलंब न करता थेट कारवाई करावी.
  • वसूल होणाऱ्या थकबाकीला प्राधान्य द्यावे,
  • वसुली अडचणी येत असणाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये वसुली करा.
  • सर्व विभागांनी वसुली वाढविण्याच्या दृष्टींने नियोजन करा, वसुलीत हयगय करू नये.
  • वसुलीबाबत येथून पुढे दर आठवड्यास आढावा

पाच कोटी एलबीटी वसुलीचे नियोजनस्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेमध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही. मार्चपर्यंत शिबिर घेऊन ५ वसुली करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागानेही झालेल्या वसुलीची माहिती दिली.२६ हजार मिळकतींना नोटीसघरफाळा विभागाने आजअखेर २९ कोटी ७३ लाखांची वसुली केली असून २६ हजार मिळकतदारांना नोटिसा बजावली आहे. पाच लाख व त्यावरील थकबाकीधारकांना नोटीस काढण्यात येत असून १५ हजार मिळकतधारकांनी ऑनलाईन घरफाळा भरला असल्याचे करनिर्धारक संजय भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर