शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांना पशुखाद्य दरवाढीचा दणका, प्रतिकिलो दोन रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 15:24 IST

निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या ‘मयूर’सह ‘गोकुळ’नेही प्रतिकिलो दोन रुपये वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच लागूही झाली आहे. या वाढीला कच्च्या मालाची उपलब्धता, इंधनासह वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीचे कारण संघाकडून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादकांना पशुखाद्य दरवाढीचा दणका, प्रतिकिलो दोन रुपये वाढ‘मयूर’पाठोपाठ ‘गोकुळ’चीही दरवाढ, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण

कोल्हापूर : निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या ‘मयूर’सह ‘गोकुळ’नेही प्रतिकिलो दोन रुपये वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच लागूही झाली आहे. या वाढीला कच्च्या मालाची उपलब्धता, इंधनासह वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीचे कारण संघाकडून देण्यात आले आहे.मंगळवारी (दि. २३) लोकसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या मयूर या ब्रॅँडने तीन टप्प्यांत दरवाढ केली. प्रतिकिलो दोन रुपयांप्रमाणे ५० किलोंच्या पोत्याला ६० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी ‘गोकुळ’च्या महालक्ष्मी ब्रॅँडच्या पशुखाद्यातही दोन रुपयांची वाढ झाली.

ही वाढ पोत्यामागे १०० रुपये आहे. ‘महालक्ष्मी गोल्ड’चा दर १९ रुपयांवरून २१ रुपये प्रतिकिलो झाला आहे, तर महालक्ष्मी मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. काफ स्टार्टरमध्येही दोन रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवत आहे, जनावरांच्या आजारपणावरील खर्च वाढला आहे. त्यात यंदा साखर कारखाने लवकर बंद झाल्याने ओल्या वैरणीचीही टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. ओल्यासह सुक्या वैरणीचे दरही भडकलेले आहेत. अशा परिस्थितीत जनावरे जगविणे जिकिरीचे होत असताना आता पशुखाद्यातही वाढ झाल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला आहे.

गोकुळ पशुखाद्य दर (प्रतिकिलो)खाद्यप्रकार             प्रमाण          जुने दर            नवीन दर

  1. महालक्ष्मी गोल्ड            ५०             ९५०               १०५०
  2. मिल्क रिप्लेसर             १०             ५००                  ५५०
  3. काफ स्टार्टर                   २५            ६००                  ६५०
  4. फिडींग पॅकेज                  ३५            ५६०                 ६१०

 

कच्च्या मालामुळेच दरवाढगेले वर्षभर कोणतीही दरवाढ झालेली नव्हती; पण आता दुष्काळी परिस्थितीमुळे कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, डिझेल, वाहतुकीसह वीज दरवाढीमुळे ही वाढ करण्याशिवाय संघासमोर पर्याय नव्हता. संघाचा तोटा वाढत असल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.रवींद्र आपटे,चेअरमन, गोकुळ दूध संघ

 

दूध उत्पादकांचे कंबरडे मोडलेपशुखाद्याचे दर गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढले आहेत. त्या तुलनेत दुधाच्या खरेदीदरात मात्र एक रुपयाही वाढ झालेली नाही. वैरणीचे दरही वाढलेले असल्याने जनावरे सांभाळणे अवघड होऊन बसले असताना आता पशुखाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने आमचे कंबरडेच मोडले आहे. नफा राहू दे, एकूण खर्च वजा जाता शेणाशिवाय हातात काहीच पडत नसल्याने आमचे सगळे आर्थिक चक्रच विसकटले आहे.आकाश पाटील,जांभळी, ता. शिरोळ (दूध उत्पादक ) 

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर