शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बँकेत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धक्का बसणार?, १४ संचालक नॉट रीचेबल, कोल्हापूर केंद्रस्थानी

By सचिन भोसले | Updated: November 24, 2023 15:56 IST

सदावर्ते यांचा मनमानी कारभार, मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले

कोल्हापूर : एसटी बँकेतील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील १४ संचालकांनी  गुरुवारी (दि.२३) सदावर्ते यांनी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला थेट दांडी मारली. आपले मोबाईल फोनही बंद ठेवले आहेत. त्यामुळे सत्तापालट होती की हे पेल्यातील वादळ ठरते. याबाबत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते. बँकेची सत्ता आणि धुरा हाती आल्यानंतर ॲड. सदावर्ते यांनी कोणताही बँकिंग व्यवस्थापनाचा अनुभव नसताना आपले मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले. या कालावधीत बँकिंग व्यवहारावर रिझर्व बँकेने ही काही सूचना केल्या. मात्र त्यांचे पालन न करता उलट मनमानी कारभार केला. गेली काही महिन्यांपासून कोल्हापुरसह बऱ्याच शाखा मधील व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्ज, ठेवी व दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्मचारीमध्ये नाराजी आहे. याबद्दल विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी सरकारला कारवाई करण्याची मागणी केली होती. राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांमधील नाराजी आणि दिवसेंदिवस वाढणारा संताप याचा विचार करून १९ पैकी १४ संचालकांमध्ये ॲड. सदावर्ते यांच्या कारभाराबद्दल नाराजी होती. त्याचा परिणाम गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिसून आला.या १४ संचालकांनी बैठकी ला उपस्थित न राहता थेट कोल्हापूरकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर विभागाची प्रतिनिधित्व करणारे संचालक संजय घाटगे मोबाईल फोन सुरू आहे, पण स्वीकारत नाहीत. ते ॲड.सदावर्ते यांच्या जवळ असल्याचे बोलले जात आहे.कोल्हापूर केंद्रस्थानीबँकेच्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत न उपस्थित राहता यातील १४ संचालकांनी कोल्हापूरला जाण्याचा व तिथेच येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतल्याचेही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे ॲड. सदावर्ते यांनी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला डावली त्याच कार्यकर्त्यांनी या चौदा संचालकांना येथे आणल्याची चर्चाही कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

बँकेच्या निवडणुकीत निवडून येताना ॲड. सदावर्ते यांनी व त्यांच्या पॅनल मधील सहकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बँकेची कामकाज सुरळीत झाली पाहिजे व दिलेली आश्वासनही त्यांनी पाळली पाहिजेत. बँक वाचली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे. - उत्तम पाटील,  विभागीय सचिव एसटी कामगार संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेbankबँक