शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

'घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीचा सिलॅबसच बदलला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:39 IST

योगेंद्र यादव । युद्धामागे लपून निवडणूक लढवू पाहत आहेत

पंतप्रधानांनी विविधतेलाच आव्हान दिले आहे. त्यांनी सर्वधर्मीयांना समान वागणूक द्यायला हवी. पण अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. हिंदू-मुस्लीम आधारावर नागरिकत्व कायदा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटते हाच देशद्रोह आहे.विश्वास पाटील

कोल्हापूर : देशात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, राफेलमधील भ्रष्टाचार हेच मुद्दे ऐरणीवर होते; परंतु त्यामध्ये आपला निभाव लागणार नसल्याचे लक्षात आल्यावर घाबरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीचा सिलॅबसच बदलला आणि ते आता दहशतवादाविरोधातील युद्धाच्या मागे लपून ही निवडणूक लढवू पाहत आहेत, अशी टीका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नेते व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.या निवडणुकीचे तुम्हांला काय

वेगळेपण वाटते?ही निवडणूक इतिहासातील तिसरी महत्त्वाची निवडणूक आहे. पहिल्या १९५२ च्या निवडणुकीने हे दाखवून दिले गरीब व अज्ञानी भारतातही लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. पुढे १९७७ ला याच लोकशाहीला आणीबाणीचे नख लागले तेव्हा जनतेने त्याला कडाडून विरोध केला व लोकशाही वाचविण्यासाठीच ही निवडणूक झाली. यंदाच्या निवडणुकीत भारताचा मूळ स्वधर्म वाचविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व बेरोजगारांचे नुकसान तर केलेच, पण लोकशाहीच्या तीन मजबूत स्तंभांवरच हल्ला केला. हे तीन स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य, विविधता व विकास. मोदी सरकारने संसद, न्यायपालिका व प्रशासन या प्रत्येक संस्थेचा गळा घोटण्याचे काम केले आहे. आणीबाणीत नव्हता, तेवढ्या दबावाखाली आज माध्यमे आहेत. यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर भारतातील लोकशाही राजवटीचे बोन्साय होऊन जाईल.राजकीय सद्य:स्थितीविषयी

तुम्हाला काय वाटते?पुलवामातील दहशतवादी हल्ला व भारताने बालाकोट येथे केलेला हवाई हल्ला हे दोन्ही मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले गेले आहेत. त्याबद्दल देशातील कुणाच्याच मनांत शंका किंवा दोन प्रवाह नाहीत. सुरक्षा दलाच्या कारवाईबद्दल सर्व भारतीयांमध्ये अभिमानाचीच भावना आहे. या शौर्याबद्दल आम्ही जवानांना सलामच करतो. पण त्यांचे मोठेपण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा निवडणुकीसाठी वापर करणे गैर आहे. दहशतवादाच्या विरोधातील कारवाई आणि निवडणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांची सरमिसळ करून मोदी निवडणूक लढवू पाहत आहेत. हवाई हल्ल्यामुळे त्यांना काहीशी सहानुभूती जरूर मिळाली; परंतु ‘मिशन शक्ती’ ही उपग्रह पाडण्याची चाचणी यशस्वी केल्यानंतर त्यांचा त्यामागील खटाटोप सर्वांच्याच लक्षात आला. यामागे देशभक्ती कमी व निवडणुकीचे राजकारणच जास्त होते.संडे स्पेशल मुलाखतनिवडणुकीच्या आधी जे वातावरण होते, त्याला मोदी घाबरले. पण पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात जवानांचे रक्त सांडले आणि यांच्या तोंडाला पुन्हा सत्तेचे पाणी सुटले. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सारा देश त्यांच्यासोबत आहे; परंतु त्यांनी त्याचे श्रेय घेता कामा नये. जगण्या-मरण्याचे प्रश्न बाजूला पडून राष्ट्रवाद, स्वाभिमान, देशद्रोह याभोवती ही निवडणूक केंद्रिभूत व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत.मोदींना पर्याय काय याचे उत्तर लोकांकडे नाही. स्वच्छ दृष्टिकोन, विकासाचा कृती कार्यक्रम व मजबूत नेतृत्व यांवर आधारित प्रामाणिक आघाडीचा पर्याय त्याच्यासमोर नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाElectionनिवडणूक